हृतिक रोशनने नाकारलेला चित्रपट अक्षय कुमार स्वीकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 10:18 IST
काही दिवसांपासून बातमी अशी होती की हृतिक विकास बहालच्या नवा चित्रपट 'सुपर ३०' मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार. हा चित्रपट ...
हृतिक रोशनने नाकारलेला चित्रपट अक्षय कुमार स्वीकारणार?
काही दिवसांपासून बातमी अशी होती की हृतिक विकास बहालच्या नवा चित्रपट 'सुपर ३०' मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार. हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. पण आता अशी चर्चा आहे की ह्रतिक रोशनने हा चित्रपट सोडला आहे. गेल्या आठवड्यात चित्रपटात काही बदल करण्यात आले जे ह्रतिकला मान्य नव्हते म्हणून त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे समजतेय. आता चित्रपटाचे मेकर्स हृतिकच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटासाठी अक्षय कुमारचा विचार करण्यात आलेला आहे. सध्या अक्षय कुमार या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचतोय. निर्माते विनय सिन्हा ह्यांची कन्या प्रीती सिन्हाने या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले आहे. तिला हा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे.ALSO READ : राकेश ओम प्रकाश मेहरांच्या चित्रपटात दिसणार ह्रतिक रोशन?हृतिकने हा चित्रपट आनंद कुमार यांच्याभेटीनंतर सोडून दिला. हृतिकच्या क्रिएटिव्ह टीमला चित्रपटाच्या पटकथेला घेऊन अडचण होत होती. राकेश रोशन आणि हृतिक रोशन या स्क्रिप्टमध्ये काही बदल करून हवे होते त्यासाठी ते विकास बहलशी बोलले सुद्धा पण तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यांने अखेर हा चित्रपट सोडला आहे. या चित्रपटाचे शूटिंग वर्षा अखेरिस सुरू होणार होते पण आता हृतिकने चित्रपट नाकारल्यानंतर या चित्रपटाचे शूटिंग २०१८मध्ये सुरू होईल. आता पहायचे हे आहे की अक्षय कुमार हा चित्रपट स्वीकारतो की नाही कारण सध्या अक्षयकडे चित्रपटांती रिघ आहे. सध्या तो गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून टीव्हीवरील मौनी रॉय ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.