Join us

​हृतिक रोशन साकारणार ‘सुपर30’ आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 12:56 IST

‘काबील’मधून स्वत:ची ‘काबिलियत’ दाखवल्यानंतर हृतिक रोशन आता एका बायोपिकचा भाग बनणार आहे. होय, सध्या बी-टाऊनमध्ये हृतिकच्या याच बायोपिकची चर्चा ...

‘काबील’मधून स्वत:ची ‘काबिलियत’ दाखवल्यानंतर हृतिक रोशन आता एका बायोपिकचा भाग बनणार आहे. होय, सध्या बी-टाऊनमध्ये हृतिकच्या याच बायोपिकची चर्चा सुरु आहे. ही चर्चा खरी मानाल तर हृतिक रोशन हा बिहारमधील ‘सुपर30’ प्रोग्रामचे हेड आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचाच धूमधडाका आहे. अशात अनेक बडे स्टार्सही बायोपिकलाच प्राधान्य देताना दिसत आहेत. समाजमनावर छाप सोडणाºया कथा आणि व्यक्तींचे आयुष्य पडद्यावर जिवंत करणारे बायोपिक लोकांनाही आवडू लागले आहेत. कदाचित म्हणूनच हृतिकनेही आनंद कुमार यांच्यावरील बायोपिकला होकार दिला आहे.‘काबील’च्या यशानंतर हृतिक रोशन सध्या वेगळ्यात फॉर्ममध्ये आहे. अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट सध्या तो ऐकतोय. यापैकी सर्वोत्कृष्ट कथा स्वीकारण्याची त्याची इच्छा आहे. सूत्रांचे मानाल तर आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकला हृतिकने होकार दिला आहे. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाची एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.   जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात. त्यांची पत्नी,भाऊ आणि आनंद स्वत: मुलांना कोचिंग देतात तर त्यांची आई मुलांच्या जेवणासाठी धडपडत असते. ही संस्था कुणाकडूनही देणगी किंवा दान स्वीकारत नाही तर, आनंद कुमार त्यासाठी विशेष ट्युशन क्लासेस घेतात आणि त्यातून येणारा पैसा या मुलांवर खर्च करतात.