Join us  

डेटिंगच्या चर्चेदरम्यान अली गोनी आणि त्याचा भाऊ अर्सलनसोबत पार्टी करताना दिसली हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:58 PM

सुजैन ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक अली गोनीचा चुलत भाऊ व अभिनेता अर्सलन गोनीला डेट करत असल्याची बातमी आहे.

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान रिलेशनशीपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे.  सुजैन ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक अली गोनीचा चुलत भाऊ व अभिनेता अर्सलन गोनीला डेट करत असल्याची बातमी आहे. दोघे अनेकदा टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणीसोबत हँग आउट करताना दिसतात. यावर सुजैन आणि  अर्सलन अलीने  कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 लिंक-अपच्या बातम्यांदरम्यान सुजैन, एकता कपूर, अली गोनी आणि तिची चुलत भाऊ अर्सलन  आणि जास्मिन भसीनने एक पार्टी केल्याची काही फोटो  समोर आले आहेत. या फोटोंमध्ये क्रिस्टल डिसूझा, रिद्धि डोगरा, अनुष्का रंजन आणि नृत्यदिग्दर्शक शबीना खानदेखील आहेत. हे फोटो अलीकडेच झालेल्या पार्टीतले आहेत.

अशी झाली होती सुजैन आणि अर्सलन भेटकाही दिवसांपूर्वी पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून अर्सनल व सुजैन एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आणि काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून सुजैन-अर्सनल यांची भेट झाली होती. हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. देहबोलीवरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा वेगळे नाते असल्याचे स्पष्टपणे दिसते.

मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी चर्चा होती. मात्र हृतिकने हे वृत्त फेटाळून लावले होते. आम्ही आता पुन्हा एकत्र येणे शक्य नाही, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा केला होता. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले.

टॅग्स :सुहाना खानहृतिक रोशन