हृतिक रोशनचा दावा; अर्ध्या रात्री रूममध्ये आली होती कंगना राणौत, पाठोपाठ रंगोलीही आली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:11 IST
अभिनेत्री कंगना राणौतनंतर ७ आॅक्टोबर रोजी हृतिक रोशनने एका इंग्रजी चॅनेलला मुलाखत देऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कंगनाने ...
हृतिक रोशनचा दावा; अर्ध्या रात्री रूममध्ये आली होती कंगना राणौत, पाठोपाठ रंगोलीही आली!
अभिनेत्री कंगना राणौतनंतर ७ आॅक्टोबर रोजी हृतिक रोशनने एका इंग्रजी चॅनेलला मुलाखत देऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कंगनाने हृतिकवर जे काही गंभीर आरोप लावले होते, आता त्या सर्व आरोपांची आता हृतिककडून परतफेड केली जात आहे. वास्तविक जेव्हा कंगनाने हृतिकवर आरोप लावले होते तेव्हा त्याने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आतादेखील तो जेव्हा या संपूर्ण प्रकरणावर बोलला तेव्हा त्याने कंगनाचे नाव घेणे कटाक्षाने टाळले. कंगनासाठी त्याने रंगोलीची बहीण, लेडी आणि गर्ल अशा शब्दांचा वापर केला. हृतिकने म्हटले की, ‘आम्ही एकत्र काम केले, परंतु एकदाही प्रायव्हेटमध्ये मी तिला भेटलो नाही.’ यावेळी हृतिकने एक धक्कादायक खुलासाही केला. हृतिकने त्याची बाजू मांडताना म्हटले की, ‘मी या प्रकरणात बळी पडू इच्छित नाही. शिवाय स्वत:ला या प्रकरणातील दोषीही समजत नाही. माझ्या आयुष्यात असे काहीच घडले नाही, जेणेकरून मला त्याचा पश्चात्ताप होईल. मी या विषयावर बोलताना स्वत:ला खूपच अनकम्फर्टेबल समजत आहे. कारण मी जे काही बोलणार त्याचा वापर माझ्या विरोधात केला जाईल. त्यामुळे बोलताना मला याविषयीची नेहमीच भीती वाटते की, माझ्या बोलण्याचा गैर अर्थ काढला जाऊ नये. पण तरीदेखील मी यावर बोलण्याचे धाडस केले. जर मी स्ट्रॉन्ग होऊ शकतो तर मी अॅग्रेसिव्हदेखील होऊ शकतो. कारण मी जर कमजोर झालो तर लोक म्हणतील की, मी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता मी ेसर्व काही नशिबाच्या भरवशावर सोडले आहे. मला यादरम्यान शांत राहणे अधिक योग्य समजतो. कारण माझ्या बोलण्यामुळे कोणालाही मी अटेंशन देऊ इच्छित नाही. पुढे बोलताना हृतिकने म्हटले की, ‘मी कंगनाला २००९ मध्ये भेटलो होतो. त्यावेळी मी ‘काइट्स’ची शूटिंग करीत होतो. आम्ही जॉर्डनमध्ये एका पार्टीत होतो. पार्टीमध्ये तिने मला तिच्या लाइफ च्वॉइसविषयी एक अडव्हॉईस विचारली. त्यानंतर मी माझ्या हॉटेलमध्ये परत गेलो. काही वेळानंतर माझ्या दरवाजाची बेल वाजली. माझ्या रूमच्या मेन होरची बेल कोणीतरी जोरजोरात वाजवित होते. शिवाय ओरडत होते. मला तो आवाज कंगनाचा वाटला. मी दरवाजा उघडला. परंतु कंगना बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्यामुळे मी माझ्या असिस्टंटला बोलाविले. त्याने कंगनाची बहीण रंगोलीला बोलावून आणले. मी तिला कंगनाला तिच्या रूममध्ये घेऊन जाण्यास सांगितले. रंगोली माझी माफी मागत कंगनाला घेऊन गेली. यावेळी हृतिकने हेदेखील स्पष्ट केले की, ‘क्रिश-३’च्या शूटिंगदरम्यान आम्ही चांगले मित्र होतो. त्यावेळी कंगना मला प्रोफेशनल आणि वेल प्रिपेयर्ड असल्याचे समजले. त्यामुळे एक काळ असा होता की, मी कंगनाविषयी प्राउड फिल करीत होतो. ‘क्रिश-३’च्या प्रमोशनदरम्यान कंगनानेच मला सांगितले होते की, तुझ्याशी बोलताना मला खूपच लाजल्यासारखे वाटते, असेही हृतिकने सांगितले.