Join us

हृतिक रोशनने साजरा केला आजोबांचा ९२वा वाढदिवस, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 22:01 IST

अभिनेता हृतिक रोशन एक फॅमिली पर्सन आहे. जेव्हा-जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या मुलांना वेळ देणे पसंत करतो. ...

अभिनेता हृतिक रोशन एक फॅमिली पर्सन आहे. जेव्हा-जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या मुलांना वेळ देणे पसंत करतो. त्यामुळेच तो बºयाचवेळा पूर्व पत्नी सुजैन खान आणि आपल्या दोन मुलांसोबत मुव्ही, लंच-डिनरला जाताना बघावयास मिळतो. नुकतेच हृतिकचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. ज्यामध्ये तो आपले आजोबा ओम प्रकाश यांचा ९२वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये हृतिकसोबत पूर्व पत्नी सुजैनसह हृदान आणि रेहानही दिसत आहेत. हृतिकचे आजोबा चित्रपट निर्माते होते. त्यांना ‘आप की कसम’ या चित्रपटासाठी विशेषकरून ओळखले जाते. हृतिकच्या आईचे वडील अन् हृतिकचे आजोबा ओम प्रकाश यांनी १९७४ मध्ये ‘आप की कसम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानेच त्यांना ओळख मिळवून दिली. कारण हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे यश ठरला. दरम्यान, हृतिकने आजोबांच्या वाढदिवसाचे काही फोटोज् शेअर करताना त्यांच्याविषयी भावनाही व्यक्त केल्या. हृतिकने लिहिले की, एकेकाळी त्यांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी लग्नाची अंगठी विकली होती. स्ट्रीट लाइट्सच्या खाली बसून त्यांनी अभ्यास केला. पुढे इंडस्ट्रीपर्यंत प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना केला. ‘आप की कसम’सह त्यांनी २२ चित्रपटांची निर्मिती केली. आज ते ९२ वर्षाचे झाले आहेत.