Join us  

हृतिक रोशन एक्स वाईफ सुजैन खानसोबत पुन्हा झाला स्पॉट, वडील संजय खान यांनी ठेवली होती खास पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 3:31 PM

सुजैन आणि ह्रतिक दोघेही संजय खान यांच्या घरी पोहोचले.

हृतिक रोशन आणि त्याची एक्स वाईफ सुजैन खान डिनर पार्टीमध्ये एकत्र दिसले. ही डिनर पार्टी दुसरं तिसरं कुणीही नाही तर सुझैनचे वडील संजय खान यांनी ठेवली होती. सुजैन आणि ह्रतिक दोघेही संजय खान यांच्या घरी पोहोचले. 

मीडिया रिपोर्टनुसार सुजैन आणि हृतिक शनिवारी रात्री आपापल्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे संजय खान यांच्या घरी पोहोचले होते. संजय खान यांच्या जुहूमधल्या बंगल्यावर पार्टी होती.

सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपले रस्ते वेगळे केले. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले.

ह्रतिकने 2000 मध्ये  'कहो ना प्यार है'मधून डेब्यू केल्यानंतर त्याचवर्षी लग्न केलं होतं. सुजैन आणि हृतिकची बॉन्डिंग बर्‍याचदा सोशल मीडियावरही पाहायला मिळते. हृतिक जेव्हा जेव्हा अडचणीत दिसतो तेव्हा सुजैनने सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करताना दिसते. नुकतेच सुझानने हृतिकच्या वाढदिवशी एक  पोस्ट देखील शेअर केली होती.

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खान