हृतिक आणि करणमध्ये बिनसलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:27 IST
अभिनेता हृतिक रोशन आणि करण जोहरमध्ये सध्या काही तरी बिनसलंय. कधीकाळीएकमेकांचे चांगले मित्र असलेल्या हृतिक आणि करणच्या मैत्रीला ...
हृतिक आणि करणमध्ये बिनसलं ?
अभिनेता हृतिक रोशन आणि करण जोहरमध्ये सध्या काही तरी बिनसलंय. कधीकाळीएकमेकांचे चांगले मित्र असलेल्या हृतिक आणि करणच्या मैत्रीला नजर लागली की कायअसं बोललं जातंय. कारण करणच्या आगामी 'कलंक' या सिनेमात काम करण्यास हृतिकनंनकार दिलाय. हा सिनेमा स्वातंत्र्य चळवळीच्या बॅकड्रॉपवर आधारित या सिनेमातहृतिकनं काम करावं अशी करणची इच्छा होती. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक बर्मनकरणार होते. मात्र हृतिकनं करणला साफ इन्कार केलाय. त्यानं करणचा सिनेमानाकारण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 'शुद्धी' सिनेमासाठी करणची पहिलीपसंती हृतिकच होता. मात्र 'शुद्धी' सिनेमालाही हृतिकनं नकार दिला होता.