हृतिक-दिपिका येणार एकत्र ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:47 IST
आशिकी २ मधील 'तुम ही हो' गाण्याने पुन्हा एकदा जुन्या 'आशिकी'च्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. बर्याच वर्षांनंतर चित्रपट संगीताला प्रेक्षकांनी ...
हृतिक-दिपिका येणार एकत्र ?
आशिकी २ मधील 'तुम ही हो' गाण्याने पुन्हा एकदा जुन्या 'आशिकी'च्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. बर्याच वर्षांनंतर चित्रपट संगीताला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. म्युझिकल ब्लॉकबस्टर 'आशिकी २' च्या ग्रँड सक्सेस नंतर या चित्रपटात मुख्य भूमिकेत चमकणारे आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर रातोरात स्टार झाले होते. तेव्हापासूनच याच्या सिक्वेल बाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. आता कदाचित हेच अंदाज सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. 'आशिकी ३' बाबत हालचाली सुरू झाल्या असून यात हृतिक रोशन आणि दिपिका पदुकोन यांना लीड रोल मध्ये घेण्याचा विचार निर्माते करत आहेत, अशी चर्चा आहे. हे जर खरे झाले तर हृतिक आणि दिपिकाची फ्रेश केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळेल. हे दोन्हीही गुणी कलाकार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसतील.