Join us

​एका रात्रीचे किती घेशील? सोफिया हयातने दिले सणसणीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 13:42 IST

सोफिया हयात किती मोठी कॉन्ट्रव्हर्सी क्विन आहे, हे आपल्या सर्वांनाचं ठाऊक आहे. आधी ती नन बनली. मग नन बनल्यानंतरचे ...

सोफिया हयात किती मोठी कॉन्ट्रव्हर्सी क्विन आहे, हे आपल्या सर्वांनाचं ठाऊक आहे. आधी ती नन बनली. मग नन बनल्यानंतरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने खळबळ उडवून दिली. यापश्चात रोमानियन बॉयफ्रेन्डसोबत लग्न करून तिने सगळ्यांना धक्का दिला. आता सोफिया पुन्हा चर्चेत आहे. एका ट्रोलरला तिने सणसणीत उत्तर दिले आहे. या ट्रोलरसोबतचे चॅटींग सोफियाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चॅटनुसार, एका मुस्लिम युवकाने सोफियाला एका रात्रीचा रेट विचारला. साहजिकचं त्याचा हा प्रश्न पाहून सोफिया भडकली. ‘आधी तुझ्या आईला, मग बहिणीला आणि मग पत्नीला जावून विचार. त्या तुला एका रात्रीचा रेट सांगतील,’ असे सोफियाने त्याला सुनावले. यावर, ‘पण त्या तुझ्यासारखे शरीर दाखवत फिरत नाही,’असे त्या व्यक्तिने लिहिले. यावर सोफियाने पुन्हा त्या व्यक्तिला धारेवर धरले. ‘तुला जन्म दिला तेव्हा,तुझ्या आईने तुला शरीर दाखवले होते. तुझ्या मेंदूला शुद्धीकरणाची गरज आहे. तुझ्यासाठी रमजानचा काहीचं अर्थ नाही?’ असे तिने लिहिले.या चॅटच्या स्क्रिनशॉट सोफियाने शेअर केला आहे. सोबत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. मी जाणीवपूर्वक त्या व्यक्तिच्या जातीचा उल्लेख केला आहे. कारण सध्या रमजान सुरू आहे, असे तिने या व्हिडिओत म्हटले आहे.ALSO READ : पतीपासून वेगळे झालेल्या सोफिया हयातचं मन झालं बावरं, पुन्हा एका नव्या बॉयफ्रेंडच्या शोधात काही दिवसांपूर्वी  पती ब्लाद पासून वेगळे होत असल्याचं तिने म्हटले होते. पतीने फसवल्याचा आरोप करत तिने त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. पतीने साखरपुड्याची अंगठी आणि महागडं घड्याळ विकल्याचा धक्कादायक आरोप सुद्धा सोफियाने केला होता. लग्न संस्थेवर विश्वास राहिला नसून एखादा चांगला बॉयफ्रेंड मिळाला तर त्याचा नक्की विचार करेन, असे असे सोफियाने म्हटले  होते. त्याआधी तिने आपण प्रेग्नेन्ट असल्याचंही म्हटले होते. त्यानंतर गर्भपाताबाबत दुःख व्यक्त करत एक फोटो शेअर करुन शरीर पूर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगितले होते. बाळाची चाहुल लागल्यापासून आणि ते गमावल्यानंतर आता शरीराचा शेप बिघडल्याचे तिने म्हटले होते.