Join us  

या अभिनेत्रीने एकेकाळी गाजवली होती चित्रपटसृष्टी, आता ओळखणे देखील होतंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 6:29 PM

या अभिनेत्री अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

ठळक मुद्देमाला सिन्हा यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी जवळजवळ 40 वर्षं तरी बॉलिवूडमध्ये काम केले.

माला सिन्हा यांनी धुल का फूल, बहुराणी, हिमालय की गोंद में यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. त्यांचा नुकताच म्हणजेच 11 नोव्हेंबरला वाढदिवस झाला. माला सिन्हा आता इतक्या बदलल्या आहेत की, त्यांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. 

माला सिन्हा यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी जवळजवळ 40 वर्षं तरी बॉलिवूडमध्ये काम केले. माला सिन्हा यांचे खरे नाव माला नसून आल्डा होते. पण शाळेतील मुले त्यांना सतत चिडवत असल्याने त्यांनी नाव बदलायचे ठरवले. शाळेत असताना आल्डा या नावामुळे त्यांना डालडा म्हणत मुले चिडवत असत तर दुसरीकडे आई वडील त्यांना बेबी म्हणत असल्याने त्यांना बेबी या नावाने देखील लोक हाक मारायला लागले होते. त्यामुळेच त्यांनी बेबी नज्मा या नावाने बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर एक नायिका म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना त्यांनी त्यांचे नाव बदलून माला असे ठेवले. चित्रपटसृष्टीत येण्याआधी माला सिन्हा ऑल इंडिया रेडिओत गाणे गात असत. त्या अतिशय सुंदर दिसत असल्याने केदार शर्मा यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी सुचवले. सुरुवातीच्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. 

प्यासा या चित्रपटात सुरुवातीला मधुबाला काम करणार होत्या. पण काही कारणास्तव त्यांनी नकार दिल्याने माला सिन्हा यांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने माला सिन्हा यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. माला सिन्हा यांचे लग्न चिदंबर प्रसाद लोहानी यांच्यासोबत झाले होते. त्यांना प्रतिभा ही मुलगी असून तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. मुलीला बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशानंतर त्यांनी फिल्मी पार्टींमध्ये देखील हजेरी लावणे बंद केले. 

टॅग्स :माला सिन्हा