HOTNESS : ...जेव्हा ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये स्टेजवर पोहचली श्रेया घोषाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 13:58 IST
दिल्ली येथील ‘मॅडम तुसाद’मध्ये वॅक्स स्टॅच्यूच्या रूपात स्थान मिळालेल्या गायिका श्रेया घोषाल हिचा बॉलिवूडमधील प्रवास खरोखरच उल्लेखनीय असा आहे. ...
HOTNESS : ...जेव्हा ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये स्टेजवर पोहचली श्रेया घोषाल!
दिल्ली येथील ‘मॅडम तुसाद’मध्ये वॅक्स स्टॅच्यूच्या रूपात स्थान मिळालेल्या गायिका श्रेया घोषाल हिचा बॉलिवूडमधील प्रवास खरोखरच उल्लेखनीय असा आहे. त्यामुळेच तिला हा सर्वोच्च सन्मान मिळाला असावा. पश्चिम बंगाल या राज्यातील छोट्याशा गावातून बॉलिवूडमध्ये भरारी घेतलेल्या श्रेयाने खरी धूम तेव्हा उडवून दिली होती, जेव्हा ती स्ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये परफॉर्मन्ससाठी स्टेजवर पोहोचली होती. यावेळी तिने अंडरगारमेण्ट्सदेखील परिधान केलेले नव्हते. त्यामुळे तिचा हा लूक क्रिटिसाइज ठरला होता. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘मॅडम तुसाद’मध्ये वॅक्स स्टॅच्यू बसविण्यात येणार असल्याची बातमी देणाºया श्रेयाने गायिकी आणि फॅशन याची उत्तम सांगड घातली. तिने कधीही फॅशनशी तडजोड केली नाही. त्यामुळेच त्यावेळी तिच्या या हॉट लूकला क्रिटिसाइज असे संबोधले गेले होते. परंतु काहीही असो श्रेयाचा फॅशन सेन्स वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. जेव्हा श्रेया बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती खूपच लाजरी-बुजरी गायिका म्हणून ओळखली गेली. कारण बहुतेक ठिकाणी ती सिंपल आणि सोबर लूकमध्ये बघावयास मिळत असे. मात्र २०१२ मध्ये श्रेयाने परफॉर्मन्स करण्यासाठी ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये स्टेजवर एंट्री करून खºया अर्थाने धूम उडवून दिली. काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये श्रेयाचा लूक जबरदस्त हॉट दिसत होता. यावेळी तिने अंडरगारमेंट्स परिधान केले नव्हते. त्यामुळे तिच्या या क्रिटिसाइज लूकवरून बरीचशी चर्चाही घडली. मात्र त्याचबरोबर तिच्या फॅशन स्टेटमेंटचे कौतुकही केले गेले. १२ मार्च १९८४ रोजी पश्चिम बंगाल येथील ब्रह्मपूर या छोटाशा गावात जन्मलेल्या श्रेयाचा हा परफॉर्मन्स फारच धाडसी मानला जात होता. तसेच तो बॉलिवूडमध्ये छाप पाडणाराही ठरला. ‘मॅडम तुसाद’मध्ये स्थान मिळालेल्या श्रेयाविषयीची ही छोटीशी आठवण...