Join us

विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. विनोद खन्ना यांचा सर्वांत लहान मुलगा साक्षी खन्ना याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. विनोद खन्ना यांचा सर्वांत लहान मुलगा साक्षी खन्ना याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते. गायक उदित नारायण हे विनोद खन्ना यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थिती नोंदवली होती.अभिनेता जॅकी श्रॉफ हे पत्नीसह येथे उपस्थित झाले होते.विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. त्या दोघांचे नाते एक कलाकारापेक्षाही मित्रत्वाचे जास्त आहे. त्यामुळे त्यांनीही येथे हजेरी लावली होती.बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिनेता विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती नोंदवली.वडील अमिताभ बच्चन यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चन यानेही याठिकाणी हजेरी लावली.अभिनेत्री दिया मिर्झा हिला पाहताच विनोद खन्ना यांच्या कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले.अभिनेता अर्जुन रामपाल यानेही विनोद खन्ना यांना श्रद्धांजली देण्यासाठी हजेरी लावली.