Join us  

Holi 2020: होळी पार्टीत निक आणि प्रियंका सगळ्यांसमोर करत होते असे काही,कॅमे-यात झाले कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 11:08 AM

तसेच नेटीझन्सही या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव करत असून डोन्ट माईंड प्रियंका... बुरा नो मानो होली है...... अशा कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास नेमके होळीच्या सणानिमित्त पुन्हा एखदा चर्चेत आले आहेत.  प्रियंका चोप्रा पती निक जोनासह भारतात आली आहे. सोशल मीडियावर या कपलचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे अंबानींच्या कुटुंबाने होळी सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. यावेळी निक जोनास प्रियंका चोप्रासह या पार्टीत सहभागी झाले होते. निकने भारतीय परंपरेनुसार रंग उधळत सेलिब्रेशन केले. निकचे भारतीय परंपरेविषयीचे हे प्रेम पाहून सध्या त्याची खूप स्तुती केली जात आहे.

नेटीझन्सना निकचा हा अंदाज खूप पसंत पडला असून सध्या त्याचे गोडवे गात असल्याचे पाहायला मिळतंय. व्हिडीओत निक प्रियंकाच्या ड्रेसला रंगाने रंगलेले हात पुसत असल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सा-यांची पसंतीस पात्र ठरत आहे. प्रियंका आणि निकमध्ये  घट्ट बॉन्डींग असल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट होते. तसेच नेटीझन्सही या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव करत असून ''डोन्ट माईंड प्रियंका...  बुरा नो मानो होली है...... '' अशा कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेहमीच सोशल मीडियावर या कपलच्या वयामुळे त्यांना ट्रोल केले जाते.  प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. प्रियंका आणि निक यांच्या वयात 10 वर्षांचे अंतर आहे. निक हा प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. प्रियंका-निकच्या लग्नाला 1 वर्ष झाले पण आजही वयातील फरकावरून दोघांना ट्रोल केले जाते.

प्रियंकाने अनेकदा यावरून ट्रोलर्सला फटकारले आहे. पण निक आजपर्यंत यावर काहीही बोलला नव्हता. पण आता या ट्रोलिंगवर निक जोनस पहिल्यांदाच बोलला आहे .मात्र यांवेळी निकनेही नेटीझन्सना चांगलेच खडसावले.‘माझी पत्नी देखील 37 वर्षांची आहे. मला याने काहीही फरक पडत नाही,’असे निक म्हणाला. 2018 मध्ये डिसेंबर महिन्यात प्रियंका निकसह लग्नबंधनात अडकले होते. जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता.    

टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्रा