ऋतिकने केले टायगरचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 12:30 IST
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या बागी या आगामी चित्रपटाची सध्या खूप चर्चा चालू आहे. त्यामध्ये ही नुकतेच बॉलीवुडचा ...
ऋतिकने केले टायगरचे कौतुक
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या बागी या आगामी चित्रपटाची सध्या खूप चर्चा चालू आहे. त्यामध्ये ही नुकतेच बॉलीवुडचा सुपरस्टार ऋतिक रोशन याने नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून बागी या चित्रपटासाठी टायगर श्रॉफ याचे कौतुक केले आहे. आपण या चित्रपटाबद्दल आपण खूप उत्सुक असून, टायगर श्रॉफ हाच बॉलिवूडमधील पुढील लक्ष वेधणारी व्यक्ती असेल, असे ट्विट अभिनेता ऋतिक रोशन याने केले आहे. ऋतिक सध्या त्याच्या मोहंजोदडो या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. तसेच बागी हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला असून, अनेकांनी या चित्रपटाच्या प्रोमोला प्रसंती देखील दिली आहे. }}}}