Join us

जॉनने शेअर केला त्याच्या ऑपरेशनचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 14:58 IST

तोच उत्साह तोच जोष घेऊन जॉन पुन्हा एकाद रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'फोर्स 2' एक्शन  सिनेमातून रसिकांच्या ...

तोच उत्साह तोच जोष घेऊन जॉन पुन्हा एकाद रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'फोर्स 2' एक्शन  सिनेमातून रसिकांच्या भेटीला येतोय या सिनेमासाठी त्याने खूप मेहनत तर घेतली आहेच त्याहुनही जीवाची बाजी लावली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.याआधी 'फोर्स'सिनेमाच्या पहिल्या भागात त्याने केलेल्या एक्शन सीन्सचेही कौतुक झाले होते. वेगेवगळे स्टंट करत त्याने फोर्स सिनेमा गाजवला. आता पुन्हा एकदा तोच जोष,त्याच उत्साहात तो फोर्स -2 च्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे सिनेमाच्या स्टंट सीन्सच्या शूटिंगदरम्यान त्याला त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. इतकी गंभीर दुखापत होवूनही त्याने सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. जॉनची दुखापत इतकी गंभीर होती की  त्याला  सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतरत्याच्या गुडघ्याचे 3 ऑपरेशनही करावे लागले.नुकतेच जॉन अब्राहमने इन्स्टाग्राम अकाउंटवर  त्याच्या गुडघ्यांची सर्जरी करतानाचा  व्हिडियो शेयर केला आहे. त्यात डॉक्टर ज्या त-हेने त्याच्या गुडघ्यांमधून निघणारे रक्ताला साफ करत आहेत ते बघून अंगाकवर काटा नाही आळा तरच नवल.

​