हा हिरो आता जेलमध्ये जाणार आणि गाणारही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 16:05 IST
बॉलीवुडचा आणखी एक हिरो आता जेलमध्ये जाणार आहे. जेलमध्ये कैद्यांसोबत त्याला राहावं लागणार आहे. अभिनेता फरहान अख्तर कैद्यांप्रमाणे जीवन ...
हा हिरो आता जेलमध्ये जाणार आणि गाणारही !
बॉलीवुडचा आणखी एक हिरो आता जेलमध्ये जाणार आहे. जेलमध्ये कैद्यांसोबत त्याला राहावं लागणार आहे. अभिनेता फरहान अख्तर कैद्यांप्रमाणे जीवन जगावं लागणार आहे. इथं तो आपल्या संगीताची जादू दाखवणार आहे. त्याच्या संगीताचे सूर या जेलमध्ये घुमणार आहेत. वाचून नवल वाटेल, मात्र हे रियल नाही तर रिल लाइफमध्ये घडणार आहे. कारण फरहान अख्तरची लखनऊ प्रिसनर या सिनेमात एंट्री झालीय.निखील अडवाणी निर्मित या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन रणजीत तिवारी करणार आहे. जेल, कैदी यांच्या अवतीभवती या सिनेमाची कथा रंगणार आहे. या सिनेमासाठी मुंबईत जेलचा भव्य सेट उभारण्यात आलाय..