Join us  

अपघातामुळे रोजा फेम अभिनेत्याचे उद्धस्त झाले होते करिअर, कमबॅक केले तेव्हा ओळखणेही झाले होते कठिण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 5:08 PM

अरविंद स्वामी यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपाटांत त्यांनी काम केलं होतं.'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकले आहेत. अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होते.

मणिरत्नमच्या ‘रोजा’ सिनेमातून अरविंद स्वामी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सिनेमातील भूमिकेला रसिकांनी विशेष पसंती दिली होती. अरविंद स्वामी आणि अभिनेत्री मधू या दोघांची जोडी तर रसिकांची फेव्हरेट बनली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला. या सिनेमाती सर्वच गाणी लोकप्रिय झाली होती आणि आजही गाण्यांची जादू कायम आहे.अभिनेत्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दिसण्यावर त्याचे चाहते फिदा होत असत... या दोन्ही चित्रपटाद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेताअरविंद स्वामीला नव्वदीच्या दशकात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले होते.जगभरात त्याचे चाहते होते. 

अरविंद स्वामी यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपाटांत त्यांनी काम केलं होतं. अरविंद स्वामीला अभिनयात नव्हे तर बिझनेसमध्ये रस असल्याने त्यांनी अभिनयक्षेत्राला 2000 मध्ये रामराम ठोकला. अभियापेक्षा व्यवसायात व्यग्र असताना 2005 मध्ये त्यांचा एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. त्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे अनेक वर्षं व्हिलचेअरवर होते. चार ते पाच वर्षं उपचार घेतल्यानंतर ठणठणीत बरे झाले. 

पण या दरम्यान त्यांचे वजन वाढले होते. त्यांनी चित्रपटसृष्टीत कमबॅक करण्यासाठी मोठ्या मेहनतीने जवळजवळ 15 किलो वजन कमी केले. अरविंद स्वामी यांनी यापूर्वी 'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकले आहेत. अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होते. पण 'डिअर डॅड' या चित्रपटाद्वारे 2016 मध्ये अभिनयक्षेत्रात कमबॅक केले होते.

कित्येक वर्षानतंर बहुप्रतिक्षित 'थलायवी' सिनेमात अरविंद स्वामी सिनेमात एमजीआर यांची भूमिका साकारत आहेत. या लूकमध्ये अरविंद स्वामीला ओळखणे देखील कठीण जात आहे. अरविंद स्वामीने कित्येक किलो वजन कमी केले असून तो या लूकमध्ये खूपच वेगळा दिसत आहे.

टॅग्स :अरविंद स्वामीथलायवी