Join us

दादांचा मुलगा चित्रपटसृष्टीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 12:20 IST

एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार यांसारख्या चित्रपटात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारणारे दादा कोंडके केवळ मराठीच नव्हे तर अमराठी ...

एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार यांसारख्या चित्रपटात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारणारे दादा कोंडके केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांचेही लाडके होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांना कॉमेडीचा बादशहा मानले जात असे. त्यांचा मुलगा अशोक कोंडके आता चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. अशोक त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनय करणार नसून ते चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. फुल टू जुगाडू असे ते दिग्दर्शन करणार असलेल्या चित्रपटाचे नाव असून हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.