Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेमा मालिनी यांनी सांगितले शोलेमध्ये काचेवर नाचण्याचा असा होता अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 17:49 IST

हेमा मालिनी यांनी इंडियन आयडॉल मध्ये शोले या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगितले.

ठळक मुद्देहेमा मालिनी यांनी पुढे सांगितले, “शोले एक वेगळाच सिनेमा होता, मी हे सांगेन की, मी केलेल्या भूमिकांपैकी ती एक अत्यंत अवघड भूमिका होती

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हर्ष आणि भारती हे जोडपे इंडियन आयडॉल १२चे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात नुकतीच ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती.

इंडियन इंडियन आयडॉलमधील सगळ्याच स्पर्धकांनी हेमा मालिनी यांच्यासमोर एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स दिले. सायलीने ‘वादा तो निभाया’ आणि ‘हवा के साथ साथ’ या गाण्यांवर अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला. तिच्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. आपल्या परफॉर्मन्सनंतर तिने विशेष अतिथी हेमा मालिनी यांना शोले चित्रपटातील भूमिकेबद्दल आणि विशेषतः सिनेमात त्या जेव्हा काचांच्या तुकड्यांवर नाचतात, त्या दृश्याबद्दल विचारले. हेमा मालिनी यांनी सांगितले की, ती ज्यावर नाचत होती, ते काच नव्हे प्लास्टिक होते. 

 हेमा मालिनी यांनी पुढे सांगितले, “शोले एक वेगळाच सिनेमा होता, मी हे सांगेन की, मी केलेल्या भूमिकांपैकी ती एक अत्यंत अवघड भूमिका होती. त्यासाठी विविध कारणे आहेत. बहुतांशी दृश्ये मी अनवाणी पायांनी दिली होती, ती देखील बंगळूरूमध्ये, तो मे महिना होता. जमीन प्रचंड गरम असे आणि त्यात दुपारचे शूटिंग असल्यास अनवाणी चालणे फार कठीण जाई. प्रतिकूल हवामानामुळे शूटिंग करणे एरव्हीपेक्षा जास्त अवघड जात असे. पण त्या सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याचा एकंदर अनुभव मात्र खूपच छान होता.”

 

टॅग्स :हेमा मालिनीइंडियन आयडॉल