Join us

​दुष्काळग्रस्तांना प्रितीने दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 20:16 IST

नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिलाय.

नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिलाय. किंग XI पंजाब या आयपीएल टीमची सह-मालकीन असलेली प्रिती खास आयपीएलसाठी भारतात आलेली आहे. भारतातील दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्यातील निºहाळे (फत्तेपूर) या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य  दूर करण्यासाठी प्रितीने विहीर बांधून दिली आहे. या विहिरीसाठी प्रितीने निधी  दिला होता. या निधीतून गावात नवी विहीर बांधून  तयार झाली. या गावकºयांना टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यापासून त्यांना अन्नाची पाकिटे पोहोचणे ते नवी विहीर बांधून देण्यापर्यंत प्रितीने खूप मदत केली. गावात सोलर लाईट्स बसवण्यासाठीही तिने निधी दिला. प्रितीच्या सहृदयेमुळे निºहाळेवासीय आनंदात आहेत. गावकºयांच्या चेहºयांवरील आनंद टीपणाारे काही फोटोंचा व्हिडिओ प्रितीने पोस्ट केला आहे. तेव्हा बघूयात !!