Join us

​ ‘हसीना’ श्रद्धा कपूर अन् ‘दाऊद’ सिद्धांत कपूरचे असे अ‍ॅटीट्यूड तुम्ही कधी पाहिलेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 12:33 IST

होय, अंडवरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रूपातला सिद्धांत कपूर आणि दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या रूपातली श्रद्धा कपूर यांचे ‘रिल लाईफ लूक’ बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

श्रद्धा कपूर आणि तिचा रिअल लाईफ ब्रदर अर्थात भाऊ सिद्धांत कपूर यांचे ‘रिल लाईफ लूक’ बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, अंडवरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रूपातला सिद्धांत आणि दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या रूपातली श्रद्धा, अगदी हुबेहुब! ‘हसीना : दी क्वीन आॅफ मुंबई’ या आगामी चित्रपटातील श्रद्धा व सिद्धांतचा नवा लूक आऊट झाला आहे. यातील श्रद्धा व सिद्धांत या भाऊ-बहिणींचे अ‍ॅटिट्यूड एकदम हटके आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये श्रद्धा  डोळ्यांत ‘सुरमा’लावलेल्या गंभीर मुद्रेत दिसली होती. या नव्या पोस्टरमध्येही तिचा तोच गंभीर आणि आक्रमक अवतार पाहायला मिळतो आहे. सिद्धांत या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. त्यामुळे त्याचा या चित्रपटातील लूक कसा असेल, याबाबत उत्सूकता होती. त्याचा लूक समोर आला. पण ही उत्सूकता कमी होण्याऐवजी आणखी वाढली. कारण श्रद्धाचा इंटेन्स अवतार तुम्ही पाहिलाय. पण सिद्धांत आपल्या पहिल्याच चित्रपटात इतका इंटेन्स आणि पॉवरफुल एक्सप्रेशनसह दिसेल, याची कल्पनाही केली नव्हती. तो याप्रकारे त्याचा डेब्यू करेल, हाही विचार केला नव्हता. पण सिद्धांतने पहिल्याच बॉलमध्ये जणू सिक्सर मारलाय. दाऊदच्या भूमिकेत सिद्धांत एकदम जमून आलाय. त्याचा हा अ‍ॅटीट्यूड तुम्ही पाहायलाच हवा.ALSO READ : DON'T MISS : ​दाऊदच्या बहीणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूरचा दमदार फर्स्ट लूक!अपूर्वा लाखिया दिग्दर्शित ‘हसीना : दी क्वीन आॅफ मुंबई’ हा चित्रपट येत्या जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात श्रद्धा चार वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. हसीनाच्या १७ ते ४० वर्षांपर्यंतच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे या चित्रपटात दिसणार आहे.