Join us  

होय, मी रिलेशनशिपमध्ये आहे! हर्षवर्धन राणेने दिली किम शर्मावरच्या प्रेमाची कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:52 PM

अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले. पण नात्यावर बोलण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही चुप्पी साधली.

ठळक मुद्देनुकताच हर्षवर्धनचा वाढदिवस साजरा झाला. हर्षवर्धनला विश करताना किमने त्याच्यासोबत फोटो शेअर केला होता. शिवाय हॅपी बर्थ डे बेबी, चमकत राहा, असे कॅप्शन या फोटोला दिले होते.

अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले. पण नात्यावर बोलण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही चुप्पी साधली. पण आता  हर्षवर्धनने किमवरील आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

 अलीकडे किमसोबतच्या रिलेशनशिप विषयीच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धनने किमवर प्रेम असल्याचे मान्य केले आहे. होय, मी रिलेशनशिपमध्ये आहे. पण ही माझ्या आयुष्यातील अतिशय खासगी बाब आहे, असे हर्षवर्धन म्हणाला.  रिलेशनशिपच्या बातम्या नाकारण्यासारखे काहीही नाही. आम्हाला अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे आणि या भेटी कामाशी संबंधित नाहीत, हेदेखील सगळ्यांना ठाऊक आहे, असे हर्षवर्धन म्हणाला.

खरे तर हर्षवर्धनआधी किम शर्मानेही अप्रत्यक्ष का होईना आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. होय, नुकताच हर्षवर्धनचा वाढदिवस साजरा झाला. हर्षवर्धनला विश करताना किमने त्याच्यासोबत फोटो शेअर केला होता. शिवाय हॅपी बर्थ डे बेबी, चमकत राहा, असे कॅप्शन या फोटोला दिले होते. तिच्या या पोस्टवरूनच सगळे काही स्पष्ट झाले होते.

‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.  किम शर्मा तर कधीचीच बॉलिवूडमधून गायब झाली आहे. ‘मोहोब्बते’, ‘नहले पे दहला’, ‘मनी है तो हनी है’, ‘कुडियों का है जमाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली किम काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली.  

'सनम तेरी कसम' या चित्रपटात हर्षवर्धनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मात्र, बॉलिवूडमधील त्याचे करिअर तितके यशस्वी राहिले नाही. किम शर्माच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. 'मोहोब्बते', 'नहले पे दहला', 'मनी है तो हनी है', 'कुडियों का है जमाना', 'जिंदगी रॉक्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली किम काही काळानंतर बॉलिवूडमधून गायब झाली. मात्र, आता या रिलेशनशिपमुळे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

टॅग्स :किम शर्मा