आता ‘हॉरर हिरो’ बनणार हर्षवर्धन कपूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 00:29 IST
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचे ग्रह सध्या फारसे चांगले नाहीत, असेच दिसतेय. ‘मर्जिया’ हा हर्षवर्धनचा पहिला डेब्यू ...
आता ‘हॉरर हिरो’ बनणार हर्षवर्धन कपूर !
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचे ग्रह सध्या फारसे चांगले नाहीत, असेच दिसतेय. ‘मर्जिया’ हा हर्षवर्धनचा पहिला डेब्यू सिनेमा आपटला. यामागे काय कारण, हे आम्हाला ठाऊक नाही. हर्षवर्धनची चित्रपटांची निवड चुकली की आणखी काही, यावर आम्ही चर्चा करणार नाही. पण एक मात्र खरे, फ्लॉप चित्रपटाने हर्षवर्धन शिकायचे ते शिकला. होय, कदाचित त्यामुळेच हर्षवर्धनने एक वेगळा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कुठला तर हॉरर चित्रपट करण्याचा.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षने अलीकडे दिग्दर्शक अशीम अहलुवालिया यांच्याशी या हॉरर चित्रपटाबाबत चर्चा केली. अशीम यांना २०१२ मध्ये ‘मिस लवली’ या चित्रपटाने मोठी ओळख दिली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट वाखाणला गेला होता. यानंतर गतवर्षी अशीम दिग्दर्शित ‘डॅडी’ रिलीज झाला. अरूण गवळीच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाकडूनही अशीम यांना ब-याच अपेक्षा होत्या. पण या चित्रपटाने अशीम यांना म्हणावे तसे यश दिले नाही. या चित्रपटानंतर अशीम एक हॉरर चित्रपट घेऊन येणार आहेत आणि या त्यांच्या चित्रपटात हर्षवर्धनची वर्णी लागणे जवळपास निश्चित आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर यांची कंपनी करणार असल्याचीही खबर आहे. (आता पापा अनिल कपूरला मुलासाठी एवढे करणे तर भागचं आहे.) आता फक्त पापाचे हे प्रयत्न किती फळास येतात आणि एक हॉरर चित्रपट हर्षवर्धनला किती यश मिळवून देतो, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. तूर्तास हर्षवर्धनला शुभेच्छा देणे एवढेच आपल्या हातात आहे.ALSO READ : सारा अली खानशी झालेल्या ब्रेकअपनंतर या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय सोनम कपूरचा भाऊ