Join us  

शाहरुखचा विनम्रपणा पाहून हर्ष गोएंका भारावले; म्हणाले, "वर्ल्ड कप फायनलमधील हा एकच क्षण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:57 PM

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शाहरुख-आशा भोसले यांच्या व्हिडिओने मात्र कित्येकांची मनं जिंकली.

वर्ल्डकप २०२३ मधील अंतिम सामना रविवारी (१९ नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगला. ऑस्ट्रेलियाने दमदार खेळी करत भारताला नमवत विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप हुकल्यामुळे भारतीयांचं स्वप्न भंगलं. हा सामना पाहण्यासाठी आणि टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. शाहरुख खान, आशा भोसले, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, आयुष्मान खुराना हे कलाकार उपस्थि होते. या सामन्यादरम्यानच्या एका व्हिडिओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यानचा शाहरुख आणि आशा भोसले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहरुख आणि आशा भोसले यांच्या गप्पा रंगलेल्या असताना शाहरुख त्यांच्या हातातील कप उचलतो. त्याच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. शाहरुखच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनीदेखील हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शाहरुख-आशा भोसले यांच्या व्हिडिओने मात्र कित्येकांची मनं जिंकली. हर्ष गोएंका यांनीही हा व्हिडिओ ट्वीट करत शाहरुखचं कौतुक केलं आहे. "भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल मॅचमधील एकमेव हृदयस्पर्शी क्षण", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, भारताचं वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं असलं तरी सोशल मीडियावरुन टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटीही पोस्ट करत टीम इंडियाला पाठिंबा देत आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानआयसीसी आंतरखंडीय चषकआशा भोसलेऑफ द फिल्ड