सुशांत सिंग राजपूत ड्रायव्ह चित्रपटासाठी घेतोय अशी मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:02 IST
नुकताच 'मैं तेरा हिरो' गाण्यामध्ये शर्टलेस अंदाजात सुशांत सिंग राजपूत दिसला होता. सुशांतचे फॅन त्याची बॉडी बघून वेडे झाले ...
सुशांत सिंग राजपूत ड्रायव्ह चित्रपटासाठी घेतोय अशी मेहनत
नुकताच 'मैं तेरा हिरो' गाण्यामध्ये शर्टलेस अंदाजात सुशांत सिंग राजपूत दिसला होता. सुशांतचे फॅन त्याची बॉडी बघून वेडे झाले होते. या गाण्यातील डान्स मुव्ह त्याच्या फॅन्सना खूप आवडल्या होत्या. सध्या सुशांत त्याचा आगामी चित्रपट ड्राईव्हच्या गाण्याच्या तयारी आहेत. सुशांतने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट केदारनाथच्या चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्युल पूर्ण केले आहे. सुशांतकडे ड्राईव्ह चित्रपटाच्या शूटिंग करण्यासाठी कमी वेळ आहे. या गाण्याची शूटिंग इस्राईला होणार आहे. या गाण्यासाठी सध्या तो त्याच्या लुक्सवर काम करतो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत आपल्या ट्रेनरला केदानाथच्या शूटिंग दरम्यानसोबत घेऊन गेला होता. या गाण्यात खूपसारे बेअर चेस्ट सिक्वेन्स आहेत त्यामुळे सुशांत आपल्या त्वच्या चांगली कशी राहिल याची काळजी घेतो आहे. सुशांतला या गाण्यात बारीक दिसायचे आहे. ज्यासाठी त्याला 7 किलो वजन कमी करायचे आहे. या गाण्यासाठी सुशांत तीन महिन्यात तयारी करायची आहे. त्यासाठी तो 15 दिवस केटो डाएट करतो तर 15 दिवस लो-कार्बन आहार घेतो. त्याच्या व्यायामामध्ये क्रॉस फिट, वेट ट्रेनिंग आणि कार्डिओचा समावेश आहे. ऐकूणच काय तर सुशांत सध्या एका गाण्यासाठी आपल्या आहारावर आणि लूक्सवर खूपच मेहनत घेताना दिसतो आहे. यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. सुशांत नुकतेच सारा अली खानसोबत केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण केले आहे. उत्तरांखडमध्ये चित्रपटाची शूटिंग होणार हा पहिलाच चित्रपट आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे.सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. यात सुशांत आणि साराची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. हा चित्रपट 18 जून 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ALSO READ : ‘या’ रिमेकमध्ये सुशांत सिंग राजपूत बनणार ‘कॅन्सर सरवाइवर’!!सुशांत याआधी आलेला ‘राबता’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यामुळे त्याला केदारनाथ आणि ड्रायव्ह चित्रपटाकडून खूप अपेक्षा असणार आहेत. याशिवाय तो चंदा मामा दूर के मध्ये ही झळकणार आहे.