माहिराने घेतला ‘रईस’चा धसका !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 13:46 IST
शाहरूख खानच्या ‘रईस’ या आगामी चित्रपटातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान बॉलिवूड डेब्यू करते आहे. हीच माहिरा सध्या जरा चिंतेत ...
माहिराने घेतला ‘रईस’चा धसका !!
शाहरूख खानच्या ‘रईस’ या आगामी चित्रपटातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान बॉलिवूड डेब्यू करते आहे. हीच माहिरा सध्या जरा चिंतेत आहे. होय,‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये पाकी अभिनेता फवाद खान याची झालेली ‘गत’ पाहून माहिरा मनातून दचकली आहे. पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याचा मुद्दा अद्यापही तापलेला आहे. या मुद्यामुळेच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ अडचणीत आला. याऊपरही हा सिनेमा शांततेत रिलीज झाला. मात्र यासाठी करण जोहरला बराच घाम गाळाला लागला. खरे तर इतक्या सगळ्या खटाटोपानंतर चित्रपट रिलीज झाला. पण यातील फवादची भूमिका पाहून त्याच्या चाहत्यांची पुरती निराशा झाली. फवादची लोकप्रीयता पाहून ‘ऐ दिल है मुश्किल’ त्याची भूमिका वाढवण्यात आल्याचे करणने शूटींगदरम्यानच्या एका मुलाखतीत सांगितले होते. पण प्रत्यक्षात फवादच्या वाट्याला उण्यापुºया नऊ मिनिटांचीच भूमिका आली. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी कलाकारांवरून निर्माण झालेला वाद. होय, याच कारणामुळे ऐनवेळी फवादच्या रोलला कात्री लावण्यात आली आणि तो या चित्रपटात केवळ नावापुरता दिसला. माहिराने नेमक्या याच गोष्टीचा धसका घेतला आहे. फवादची जी गत झाली तशीच आपली तर होणार नाही ना?, या भीतीने तिला ग्रासले आहे. ‘रईस’मध्ये माहिरा शाहरूखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजे यात तिच्या वाट्याला फार काही करण्यासारखे नाही, हे गृहित आहे. त्यामुळेच वादाला कारण नको, असा विचार करून मेकर्सनी माहिराचा रोल कापण्याचा विचार केला तर ते सहज शक्य आहे. असे झाले तर माहिरा ‘रईस’मध्ये फवादप्रमाणेच केवळ नावापुरती असेल. माहिरा नेमकी यामुळे चिंतीत आहे.