Join us

​संजयला बॉलिवूडच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 08:34 IST

सन १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी ४२ महिने तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता संजय दत्तची आज गुरुवारी येरवडा तुरुंगातून सुटका करण्यात आली. ...

सन १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी ४२ महिने तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता संजय दत्तची आज गुरुवारी येरवडा तुरुंगातून सुटका करण्यात आली. संजय घरी परतताच बॉलिवूडमधील त्याच्या शुभचिंतकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा एकच वर्षाव केला. संजयचे भावी आयुष्य शांततापूर्ण व आनंददायी जावो. त्याच्या प्रगतीचा आलेख सतत चढता राहो, अशी कामना बॉलिवूडने व्यक्त केली.महेश भट्ट : चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी संजयला खास शुभेच्छा दिल्या. लोकांनी नेहमी संजय संपला असे मानले. मात्र जिगरबाज संजयने प्रत्येकवेळी धडाकेबाज वापसी करीत, सर्वांना चकीत केले. याहीवेळी संजय एक दृढ, संयमी व सक्षम व्यक्ति बनून सर्वांसमोर येईल, याचा मला विश्वास आहे.  सुभाष घई: संजयसोबत ‘खलनायक’ सारखा सुपरहिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक सुभाष घई यांनीही संजयला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मी संजयला ‘विधाता’ आणि ‘खलनायक’पासून ओळखतो. दोन महिन्यांपूर्वी मी संजयला भेटलो होतो. मला आता केवळ माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे मला तो म्हणाला होता. संजय हेच करेल, मला विश्वास आहे.रेंसिल डिसिल्व्हा :  सन २०१३ मध्ये तुरुंगात जाण्यापूर्वी संजयने  दिग्दर्शक रेंसिल डिसिल्व्हा यांचा ‘उंगली’  चित्रपटासाठी पूर्ण केला होता. रेंसिल यांनी संजयच्या आयुष्यात शांतता नांदो,अशा शुभेच्छा दिल्या. आता त्याला आरामाची गरज आहे. तो परतला याचा मला आनंद आहे.ग्रेसी सिंह : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये संजयसोबत काम करणाºया अभिनेत्री ग्रेसी सिंह हिनेही संजयच्या सुटकेवर आनंद व्यक्त केली. संजयसाठी मी अतिशय आनंदात आहे, असे ती म्हणाली.जूही चावला : अभिनेत्री जूही चावलाने टिष्ट्वटरवरून संजयला शुभेच्छा दिल्या. तुझे स्वागत आहे संजय. शुभेच्छा, असे टिष्ट्वट तिने केले.