Join us  

Happy Birthday Rekha: वयाच्या 65 व्या वर्षीही इतक्या सुंदर दिसतात रेखा, हे आहे यामगचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 6:00 AM

वयाची 65 वर्षे ओलांडली असूनही रेखा यांचे सौंदर्य पाहून सारेच त्यांच्या प्रेमात पडतात.

अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. भानुरेखा गणेशन ते बॉलीवुड दिवा रेखा असा त्यांचा प्रवास तितका सोपा नव्हता. संघर्ष हा रेखा यांच्या जीवनात बालपणापासूनच होता. मात्र प्रत्येक परिस्थितीवर त्यांनी यशस्वीपणे मात केली. त्यांच्या सुरुवातीच्या सावळ्या लूकमुळे निर्माते त्यांना संधी द्यायला तयार नव्हते. मात्र तरीही रेखा यांनी हार मानली नाही. स्वतःमध्ये बदल घडवत त्यांनी 'दो अंजाने' सिनेमातून दमदार एंट्री केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री ते बॉलीवुड दिवा असा थक्क करणारा प्रवास केला. रेखा यांनी बॉलीवुडमध्ये जे स्थान मिळवलं आहे ते कुणीच मिळवू शकत नाही. 

त्यांच्या अभिनयाप्रमाणे त्यांच्या सौंदर्य पाहून आजही सारेच फिदा होतात. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे वयाची 65 वर्षे ओलांडली असूनही रेखा यांचे सौंदर्य पाहून सारेच त्यांच्या प्रेमात पडतात. तरूण अभिनेत्रींनाही लाजवेल असे त्यांचे सौंदर्य आजही टीकून आहे. मुळात रेखा या वयातही इतके फिट आहेत यामागेही एक खास रहस्य आहे ते म्हणजे योग्य रितीने घेतलेला आहार . नियमितपणे योगा करणे आणि मेडीटेशन करण्याला त्या प्राधान्य देतात. याकडे त्या कधीच दुर्लक्ष करत नाही. 

रेखा एक विशेष डाएट फॉलो करतात स्कीनला हाइड्रेट ठेवणं आणि बॉडीला डीटॉक्स करणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे  पूर्ण दिवसात 10 ते 12 ग्लास पाणी त्या पितात. रेखा कधीच जंक फुड खात नाहीत. कमी तेल आणि मसाल्यांचा कमीत कमी वापर असलेल्याच भाज्या त्यांच्या जेवणात असतात. भाजी, चपाती आणि दही असा त्यांचा नियमित आहार असतो. रेखा या रोज 7.30 वाजता  रात्रीचे जेवण जेवतात आणि लवकर झोपतात. जेवण झाल्यानंतर 2 तासाचे गॅपनेच त्या झोपतात. झोपण्याआधी आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. त्यामुळे स्कीननला क्लेंज, टोनर आणि मॉइश्चराइज लावतात. 

गेल्याचवर्षी आयफा अवॉर्डमध्ये त्यांनी धमाकेदार स्टेज परफॉर्म केला होता. वयाच्या 60 व्या वर्षी अशा प्रकारे डान्स परफॉर्म करणा-या रेखा या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. हा परफॉर्मन्स पाहताच सारेच त्यांच्यावर फिदा झाले होते. आजही त्यांची तीच इनर्जी पाहून सारेच थक्क नाही झाले तरच नवल. 

टॅग्स :रेखा