Join us  

Happy birthday Malaika Arora! ‘छैय्या छैय्या’ गर्ल आजही दिसते इतकी हॉट! हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् !!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 9:28 AM

आज मलायका आपला ४५ वा वाढदिवस साजरा करतेय. पण तिच्याकडे बघून कुणालाही यावर विश्वास बसणार नाही. होय, एज इज जस्ट अ नंबर, असेचं काहीसे मलायकाबद्दल म्हणतात येईल.

बॉलिवूडची प्रसिद्ध ‘छैय्या छैय्या’ गर्ल मलायका अरोरा हिचा आज (23 आॅक्टोबर) वाढदिवस आहे. आज मलायका आपला ४५ वा वाढदिवस साजरा करतेय. पण तिच्याकडे बघून कुणालाही यावर विश्वास बसणार नाही. होय, एज इज जस्ट अ नंबर, असेचं काहीसे मलायकाबद्दल म्हणतात येईल.

सध्या मलायका तिच्या रिल लाईफपेक्षा रिअल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर तिचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांत दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. छैय्या छैय्या ते मुन्नी बदनाम हुई या आयटम नंबर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाने मॉडेलिंगपासून सुरुवात केली. डान्सर, व्हिजे, होस्ट, अभिनेत्री अशा अनेक रूपात ती बॉलिवूडमध्ये वावरतेय. ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाला ‘दिल से’या सिनेमातील ‘छैय्या छैय्या’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबर्ससोबत कॅमिओ रोल्स केले. तिच्यावर चित्रीत झालेले अनेक डान्स नंबर्स पॉप्युलर झाले.

मलायका व अरबाजचा १७ वर्षांचा मुलगा आहे. मात्र तिच्याकडे पाहिल्यानंतर असे अजिबात वाटत नाही. या वयातही मलायकाने स्वत:ला अगदी फिट ठेवले आहे. मायानगरीच्या ग्लॅमरस जगात टिकून राहण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे आणि मलायकाने हे महत्त्व ओळखून स्वत:ला फिट ठेवले आहे.

 पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मलायकाचे वडील मर्चंट नेव्हीत सर्व्हिसला होते. तिची बहीण अमृता अरोरासुध्दा बॉलिवूड अभिनेत्री आहे. मलायकाचे शिक्षणदेखील मुंबईतच झाले. शालेय शिक्षण मुंबईच्या चेंबूर स्थित स्वामी विवेकानंद शाळेतून तर पदवी शिक्षण जय हिंद कॉलेजामधून पूर्ण केले.

मलायका अरोरा खानचे लग्न सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानसोबत झाले होते. या दोघांची लव्ह स्टोरी रंजक आहे. १९९३ मध्ये ह्यमिस्टर कॉफीह्णच्या जाहिरातीसाठी मलायका आणि अरबाजला साइन करण्यात आले होते. ही जाहिरात एवढी बोल्ड होती, की त्यामुळे वादंग उठले होते. या वादातच मलायका आणि अरबाज यांचे सूत जुळायला सुरुवात झाली. दोघे बराच वेळ एकत्र घालवू लागले. त्यानंतर हे दोघे काही अल्बम्समध्येही झळकले. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर १९९८ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे लग्नासाठी मलायकाने अरबाजला प्रपोज केले होते. खुद्द मलायकाने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. मी व अरबाज आम्ही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. पण लग्नासाठी अरबाजने नाही तर मी त्याला प्रपोज केले होते, असे मलायकाने सांगितले होते. मलायका व अरबाज हे बॉलिवूडचे एक रोमॅन्टिक कपल होते. पण १८ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर मलायका व अरबाज यांनी अचानक घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अर्थात घटस्फोटानंतरही मलायका व अरबाज दोघेही अनेकदा एकत्र दिसले.

टॅग्स :मलायका अरोरा