Happy Birthday Kamal...जाणून घ्या, कमल हासनबद्दल काही गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 11:54 IST
कमल हासन एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. कमलने ज्या क्षेत्रात हात आजमावला, तिथे त्याच्या हाती यशचं लाभले. केवळ अभिनयच नाही ...
Happy Birthday Kamal...जाणून घ्या, कमल हासनबद्दल काही गोष्टी...
कमल हासन एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. कमलने ज्या क्षेत्रात हात आजमावला, तिथे त्याच्या हाती यशचं लाभले. केवळ अभिनयच नाही तर पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मीती, गायन,नृत्य, कोरिओग्राफी अशा सगळ्यात क्षेत्रात कमलने यशाची चव चाखली. ७ नोव्हेंबर १९५४ रोजी एका तामिळ कुटुृंबात कमलचा जन्म झाला. त्याचे बालपणीचे नाव पार्थसारथी आहे. सहा वर्षांच्या वयात ‘कलथूर कनम्मा’ या चित्रपटाद्वारे कमलने त्याच्या अभिनयाची सुरुवात केली. या पहिल्याच भूमिकेसाठी त्याला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कमल एक क्लासिकल डान्सर आणि सिंगर आहे. त्याचे त्याने खास प्रशिक्षण घेतले आहे. त्याने भरतनाट्यम् शिकले आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक बारामुरालीकृष्णा यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. सिनेसृष्टीत आपल्या चार दशकांपेक्षा अधिकच्या कारकिर्दीत त्याचे ३४फ्रॅक्चर झालेत. याऊपर त्याने आपले काम सुरु ठेवले. कमल अनेक भाषा बोलू शकतो. तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.वयाच्या १८ व्या वर्षी त्याने त्याची पहिली स्क्रिप्ट ‘उनारचिगल’ लिहिली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. कमल हा पहिला कलाकार आहे, ज्याने स्वत:चा फॅन क्लब वेलफेअर आॅर्गनायझेशनमध्ये बदलला. कमलने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. चार राष्ट्रीय पुरस्कार, १७ फिल्मफेअर पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले.