Happy Birthday Harshvardhan... जाणून घ्या, हर्षवर्धन कपूरबद्दल काही गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 12:12 IST
अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर याचा आज (९ नोव्हेंबर) वाढदिवस. ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केले. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. सध्या हर्ष ‘भावेश जोशी’ या चित्रपटात बिझी आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ यात हर्षवर्धनबद्दल काही ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी...
Happy Birthday Harshvardhan... जाणून घ्या, हर्षवर्धन कपूरबद्दल काही गोष्टी...
अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर याचा आज (९ नोव्हेंबर) वाढदिवस. ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केले. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. सध्या हर्ष ‘भावेश जोशी’ या चित्रपटात बिझी आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ यात हर्षवर्धनबद्दल काही ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी... ‘मिर्झिया’ला दिला होता नकार दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश यांनी तीन वर्षांपूर्वी हर्षवर्धनला ‘मिर्झिया’ची आॅफर दिली होती. हर्ष त्याची बहीण सोनम कपूर हिच्यासोबत मेहरा यांच्या घरी गेला होता. त्यावेळी मेहरा यांनी या चित्रपटासाठी हर्षला विचारले होते. पण तेव्हा हर्ष अनुराग कश्यप यांना असिस्ट करीत होता. त्याला हिरो नाही तर फिल्ममेकर होण्यात अधिक रस होता. त्यामुळे हर्षने त्यावेळी मेहरा यांना चक्क नकार दिला होता. पण मेहरा यांनी तीन वर्षे प्रतीक्षा केली. हर्ष एक ना एक दिवशी आपल्याला होकार देईल, कदाचित हे त्यांना ठाऊक असावे.‘मिर्झिया’साठी केली अशी तयारी ‘मिर्झिया’साठी हर्षने बराच घाम गाळला. सर्वप्रथम हर्षला यासाठी अॅक्टिंग शिकावी लागली. म्हणजेच टीना बर्टिना या अॅक्टिंग कोचकडून अॅक्टिंग शिकण्यासाठी हर्षला दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आले. टीनाने हर्षला अॅक्टिंगमधील अनेक बारकावे शिकवले.घोडेस्वारी शिकायला गेला अमेरिकेत ‘मिर्झिया’साठी हर्षला घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि पोलो शिकायचे होते. भारतात याचे ट्रेनिंग मिळाले असते. पण हर्ष समाधानी नव्हता. यासाठी तो खास अमेरिकेला गेला. आता घोडेस्वारी हर्ष इतका तरबेज झाला की, मानवांपेक्षा घोड्यांबाबत त्याला अधिक माहिती आहे.खोटेपणाचा येतो रागहर्षवर्धन कधीही खोटे बोलत नाही. यासाठी अनेकदा हर्षवर्धनने अडचणी ओढवून घेतल्या. हर्ष प्रामाणिक आहे तेवढाच स्पष्टवक्ताही आहे. एखाद्या व्यक्तिच्या नजरेत आपली चांगली प्रतीमा निर्माण व्हावी अनेकजण मुखवटे पांघरून गुडी गुडी वागतांना दिसतात. पण हर्ष यापैकी नाही. तो त्याच्या विचारांवर ठाम राहणारा व्यक्ति आहे. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, हा विचार करण्याच्या भानगडीत तो पडत नाही.सोनमपेक्षा रियाची गट्टी सोनम व रिया या दोन बहिणींपैकी हर्षचे रियाशी चांगलेच पटते. रिया ही माझ्यासारखीच ‘होम बर्ड’ आहे. याऊलट सोनम नेहमी बाहेर राहणारी. तिचा बहुतेक वेळ भटकण्यात जातो. त्यामुळे रिया व माझी गट्टी चांगलीच जमते. आम्ही दोघेही घरी असतो तेव्हा मस्तपैकी पुस्तके वाचून वेळ घालवतो,असे हर्ष सांगतो.स्वत:चे निर्णय स्वत: घेतो हर्षवर्धन स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. तो म्हणतो, पप्पा कायम बिझी राहायचे. त्यामुळे लहानपणी त्यांच्याशी फारशी जवळीक अशी नव्हतीच. आई हेच माझे विश्व होते. पण मोठा झाल्यावर मी आपोआप पप्पांच्या जवळ आलो. अर्थात मला काम मिळवून द्या, म्हणून मी कधीही त्यांना म्हटले नाही. मी माझ्या मर्जीने माझा पहिला व दुसरा चित्रपट साईन केला. आवडते कलाकारदीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, केट ब्लँचेट, ब्रिट मार्लिंग, ब्रॅड पिट, जेनिफर लॉरेन्स,फेलिसिटी जोन्स हे हर्षवर्धनचे आवडते बॉलिवूड-हॉलिवूड कलाकार आहेत.