Join us

Happy Birthday Ayesha : ​‘बोरीवली की ब्रूस ली’मधून परतणार आयशा टाकिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 12:15 IST

अभिनेत्री आयशा टाकिया हिचा आज (१० एप्रिल) वाढदिवस. सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या सिनेमाने आयशाला नवी ओळख मिळवून दिली. लग्नानंतर ...

अभिनेत्री आयशा टाकिया हिचा आज (१० एप्रिल) वाढदिवस. सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या सिनेमाने आयशाला नवी ओळख मिळवून दिली. लग्नानंतर मात्र आयशा बॉलिवूडमधून एकदम गायब झाली. पण आता कदाचित आयशाला पुन्हा एकदा बॉलिवूड खुणावू लागले आहे. खुद्द आयशाने अलीकडे एका इव्हेंटमध्ये याचा खुलासा केला. होय,  आयशा लवकरच ‘बोरीवली की ब्रूस ली’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पूर्ण व्हायला सहा महिने लागतील, असे तिने सांगितले. यापेक्षा अधिक काहीही सांगण्यास तिने नकार दिला. मला फिट होतील, अशा भूमिकांच्या मी शोधात आहे, असे ती म्हणाली. सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट, कंगणा राणौत, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण चांगले काम करत आहेत. मी त्यांच्या कामाने कमालीची प्रभावित आहे,असेही ती म्हणाली. आयशाने अलीकडेच लिप सर्जरी केली़  या सर्जरीमुळे आयशाला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावे लागले. पण ट्रोल करणा-यांना घाबरण्याऐवजी आयशाने त्यांना सणसणीत उत्तर दिले होते. तेही एक फोटोशूट करून. या फोटोशूटमध्ये आयशा कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय. एकंदर काय, तर  आयशाची ही सगळी तयारी कमबॅकसाठी होती, हे आता स्पष्ट झाले आहे.ALSO READ : ​आयशा टाकियाने केला लिप जॉब...ओळखणेही झाले कठीण!!आयशाने वयाच्या पंधरा वर्षांपासून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. हिंदी चित्रपटांशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही ती दिसली होती. सलमानसोबत ‘वॉन्टेड’ आणि अजय देवगणसोबत ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटात आयशा झळकली होती. यानंतर २००९ मध्ये आयशाने लग्नाचा निर्णय घेतला व २०११ मध्ये चित्रपटांना रामराम ठोकला. त्यावर्षी ‘मोड’ या चित्रपटात आयशाच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते.