‘बाहुबली’च्या अभिनेत्रीने शेअर केला ‘हा’ फोटो; युजर्सनी म्हटले, ‘यू आर माय डॉल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 20:21 IST
‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकलेल्या तमन्ना भाटीयाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, चाहत्यांकडून त्यास जबरदस्त पसंत केले जात आहे.
‘बाहुबली’च्या अभिनेत्रीने शेअर केला ‘हा’ फोटो; युजर्सनी म्हटले, ‘यू आर माय डॉल’
‘बाहुबली द बिगनिंग’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटीया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती नियमितपणे तिचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करीत असते. नुकताच तमन्नाने तिचा असाच काहीसा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो चाहत्यांच्या एवढा पसंतीस येत आहे की, त्यास काही मिनिटातच हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळाल्या. शिवाय तिचा हा फोटो सर्वत्र व्हायरलही केला जात आहे. तमन्नाच्या या फोटोला कॉमेण्ट्स करताना चाहत्यांनी तिच्यावर प्रचंड स्तुतिसुमने उधळली. एका युजर्सनी कॉमेण्ट करताना लिहिले की, ‘तुम मेरी परियों की रानी हो!’ दुसºया एका युजर्सनी तर असेही लिहिले की, ‘तमन्ना यू आर माय डॉल!’ दरम्यान, माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार तमन्ना सध्या ‘काने कलाई माने’ या तामीळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तमन्नाने या चित्रपटाचे एक पोस्टरही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पोस्टरमध्ये ती एका स्कूटरवर बसलेली दिसत होती. दरम्यान, तमन्ना भाटीयाने ‘बाहुबली-द बिगनिंग’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याचबरोबर साउथ व्यतिरिक्त तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. तिने ‘एंटरटेन्मेंट, हिम्मतवाला आणि हमशक्ल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र अशातही तिला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. परंतु तमन्नाची बॉलिवूडमधील धडपड अजुूाही कायम आहे.