अनेकदा कलाकारांना शूटिंगवेळी अनेक घातक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकदा शूटिंगवेळी कलाकार जखमी झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो. अशाच घातक गोष्टींचा सामना गुरु रंधावालाही करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून गुरु रांधावा त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. काश्मीरच्या बर्फाळ वातावरणात शुटिंग सुरु होते. कश्मीरमधील हवामानाविषयी काही वेगळे सांगायला नको. बर्फाची चादर ओढलेल्या कश्मीरमध्ये माइनस 9 डिग्री सेल्सियस मध्ये शूट करायचे होते.
इतक्या थंडीतही सगळेचजण कोणत्याही गोष्टीची तक्रार न करात काम करत होते. गुरु रांधावाने नुकताच शूटदरम्यानचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहून अनेकांना धक्काच बसला कारण त्याच्या नाकातून रक्क वाहत असल्याचे दिसतंय. इतक्या थंडीत शूट सुरु असल्यामुळे गुरुला थंडीचा त्रास होत असून नाकातून रक्ताच्याच धारा वाहू लागल्याचे दिसतंय.
गुरुनेच ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. युजर्सने हे फोटो पाहताच चिंता व्यक्त केली. एकाने लिहिले - काळजी घे, दुसर्या युजरने म्हटले की,तुम्ही खूप कष्ट करता. ही नक्कीच सुपरहिट ठरेल. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर गुरुने शूट पूर्ण केले.त्यामुळे नक्कीच रसिकांनाही ते आवडले अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
गुरूने अलीकडेच काश्मीरमधील आपले फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्री गायिका मृणाल ठाकूरसह शेअर केले. त्याने मृणालसोबत 'अभी ना छोड़ो मुझे'चे शूट केले होते. हा म्युझिक व्हिडिओ काश्मीरच्या गुलमर्ग येथे शूट करण्यात आला आहे. यांत दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. मृणालने गुरु रंधावाबरोबर बरेच फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. दोघेही बर्फात मस्ती करताना दिसत आहेत.यानिमित्ताने पुन्हा एकदा काश्मीरची झलक रसिकांना पाहायला मिळणार आहे.