Join us  

Birthday Special : केवळ वर्षभरात मोडला राखी-गुलजार यांचा संसार, ‘त्या’ रात्रीने बदलले नात्याचे संदर्भ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 10:37 AM

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी, गीतकार. लेखक, दिग्दर्शक गुलजार यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देएका रात्री असे काही झाले की, त्यामुळे दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण विभक्त झालेले असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. 

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी, गीतकार. लेखक, दिग्दर्शक गुलजार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या हिंदी रचनांनी चाहत्यांना वेड लावले. तुझसे नाराज नही जिंदगी...,मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने..., मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है... अश त्यांच्या गीतरचना आजही चित्रपटरसिकांना मंत्रमुग्ध करतात.गुलजार यांचा जन्म 18 आॅगस्ट 1936 रोजी पंजाबातील दीना (सध्याचे पाकिस्तान) येथे त्यांचा जन्म झाला. राम पूरणसिंग कालरा हे त्यांचे खरे नाव. गुलजार हे हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. पण आज आम्ही त्यांच्या त्यांच्या करिअरबद्दल नाही तर त्यांच्या व राखी यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

एकेकाळी अभिनेत्री राखी व गुलजार यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये जोरात होत्या. राखी व गुलजार एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1973 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांच्या संसारवेलीवर मेघना नावाचे फुलही उमलले. पण मुलीच्या जन्मानंतर काहीच काळात राखी-गुलजार यांच्यात वाद सुरु झालेत. हे वाद इतके टोकाला पोहोचलेत की, राखी यांनी गुलजारपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या विभक्त होण्याची अनेक कारणे सांगितली जातात.

अनेकांच्या मते, राखी व गुलजार यांच्या विभक्त होण्याचे कारण मीरा कुमारी होते. मीना कुमारी ही गुलजार यांची जवळची मैत्रिण होती. मीनाचे ऊर्दू प्रेम तिला गुलजार यांच्या जवळ घेऊन आली. मृत्यूपूर्वी मीनाने तिच्या कवितांची एक डायरी गुलजार यांच्याकडे सोपवली होती. गुलजार यांनी यापैकी तिच्या काही रचना प्रकाशितही केल्या होत्या.

काहींच्या मते, लग्नानंतर राखीने चित्रपटांत काम करू नये, असे गुलजार यांचे मत होते. त्यांनी राखीला हा निर्णय सांगितला होता आणि राखी यांनीही त्यांचा हा निर्णय आनंदाने स्वीकारला होता. पण किमान गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात आपल्याला भूमिका मिळाली, अशी राखींची इच्छा होती. पण गुलजार यांनी राखी यांना त्यांच्या एकाही चित्रपटासाठी साईन केले नाही. अर्थात अन्य निर्माता-दिग्दर्शक मात्र राखींना साईन करण्यास उत्सुक होते. गुलजार यांचा बहुतांश वेळ शायरी आणि गीत रचण्यात जात होता. कामामध्ये व्यस्त असल्यामुळे गुलझार राखी यांना खूप कमी वेळ देत असत. राखी यांना आधीच सिनेमात काम करण्याची इच्छा होती. एकटेपणामुळे त्यांची इच्छा अधिकच वाढली राखी या ऑफर्सबद्दल गुलजार यांच्याशी बोलू लागल्या की, त्यांच्यात वाद होत. याचदरम्यान एका रात्री असे काही झाले की, त्यामुळे दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण विभक्त झालेले असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. 

गुलजार ‘आंधी’च्या शूटींगसाठी काश्मीरला गेले होते. या चित्रपटात संजीव कुमार व सुचित्रा सेन लीड रोलमध्ये होते.  गुलजार यांच्या विरहाने राखी तळमळत होत्या.  त्या रात्री ‘आंधी’चे शूटींग संपल्यानंतर पार्टी सुरु होती. नशेच्या स्थितीत संजीव कुमार सुचित्रा सेन यांना रिझवण्याचे प्रयत्न करत होते. एका क्षणाला संजीव कुमार यांच्या त्या वागण्याने सुचित्रा वैतागल्या. स्थितीचे गांभीर्य ओळखून गुलजार सुचित्रा यांना घेऊन त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवायला निघाले. नेमक्या याचक्षणी राखी तिथे पोहोचल्या व त्यांनी गुलजार यांना सुचित्रा यांच्यासोबत पाहिले. यानंतर राखी व गुलजार यांच्यात युनिटसमोरच जोरदार भांडण झाले. असे म्हणतात की, या भांडणात गुलजार यांनी राखींवर हात उचलला. या दिवसानंतर राखी व गुलजार यांच्या नात्यातील कडवटपणा आणखी वाढला. दुस-या दिवशी सकाळी राखींनी गुलजार यांच्या विरोधानंतरही यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ चित्रपटास होकार कळवला. 

टॅग्स :गुलजारराखी