Join us  

‘गुलाबो सिताबो’ला ‘कचरे का ढेर’ म्हणणा-या केआरकेची सुजित सरकार यांनी घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 2:39 PM

नवा चित्रपट रिलीज झाला आणि स्वत:ला खूप मोठा समीक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल आर खान बरळला नाही, हे शक्यच नाही.

ठळक मुद्देकेआरकेने सुजित सरकार यांना टॅग करत ट्विट केले. पण सुजित यांनी मात्र केआरकेला टरकावून लावले.

नवा चित्रपट रिलीज झाला आणि स्वत:ला खूप मोठा समीक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल आर खान बरळला नाही, हे शक्यच नाही. आज अमिताभ बच्चन व आयुष्मान खुराणा यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आणि केआरके नेहमीप्रमाणे बरळला. ‘गुलाबो सिताबो’ म्हणजे कच-याचा ढिग असल्याचे ट्विट त्याने केले. अर्थात ‘गुलाबो सिताबो’चे दिग्दर्शक सुजित सरकार यांनी केआरकेला उडवून लावले.

काय केले केआरकेने ट्विट

सुजित सरकार यांनी ‘गुलाबो सिताबो’ ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. पण केआरकेने मात्र हा सिनेमा म्हणजे कच-याचा ढिग असल्याचे ट्विट केले. ‘गुलाबो सिताबो हा सिनेमा पाहिल्यानंतर मी डायरेक्टर सुजित सरकार यांना विचारू इच्छितो की, तुम्हाला नेमके काय सांगायचे होते? तुमचा उद्देश तरी काय होता? सिनेमा पाहणा-याचा जीव तर घेण्याची तुमचा इरादा नव्हता ना? चित्रपटगृहांत हा सिनेमा रिलीज न केल्याबद्दल आभार,’ असे केआरके आपल्या ट्विटमध्ये लिहिले. आपल्या या ट्विटमध्ये त्याने सुजित सरकार यांनाही टॅग केले.

केआरके कायम त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. या स्वयंभू समीक्षकाने यामुळे आत्तापर्यंत अनेक वाद ओढवून घेतले आहेत.

सुजित सरकार यांनी घेतली फिरकी

केआरकेने सुजित सरकार यांना टॅग करत ट्विट केले. पण सुजित यांनी मात्र केआरकेला टरकावून लावले. केआरकेच्या ट्विटला फार महत्त्व देण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी उलट त्याची मजा घेतली. ‘सर, तुम्ही माझ्या चित्रपटाला प्रत्येकवेळी इतके प्रेम देता की मी गद्गद् होतो. ‘गुलाबो सिताबो’ पाहिला याबद्दल धन्यवाद. माझ्या पुढील चित्रपटानंतर पुन्हा इथेच भेटू,’ असे लिहित सुजित सरकार यांनी केआरकेला उडवूल लावले.

टॅग्स :कमाल आर खानआयुषमान खुराणाअमिताभ बच्चन