Join us

'गाझी'साठी आजी आजोबा माझी प्रेरणा - तापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:38 IST

ऑनस्क्रीन अभिनयाची ताकद दाखवण्यासाठी स्वत:च्या आयुष्यातील अनुभव महत्त्वाचे असतात. तापसी पन्नू ही आगामी चित्रपट 'गाझी' मध्ये रिफ्युजी ची भूमिका ...

ऑनस्क्रीन अभिनयाची ताकद दाखवण्यासाठी स्वत:च्या आयुष्यातील अनुभव महत्त्वाचे असतात. तापसी पन्नू ही आगामी चित्रपट 'गाझी' मध्ये रिफ्युजी ची भूमिका करणार असून खर्‍या आयुष्यातील तिचे आदरस्थान आणि प्रेरणा म्हणजे आजीआजोबा आहेत. तिच्या आजीआजोबांना फाळणीच्यावेळी काय अनुभव आले ते तिने चित्रपटात उतरवले आहेत. फाळणीवेळी तिच्या आजीआजोबांचे आयुष्य कशाप्रकारे त्रासदायक झाले होते हे तिला सर्व माहित आहे. ते ऐकतच ती लहानाची मोठी झाली त्यामुळे त्यात काही नाविण्य तिला नव्हते. त्या दिवसांवर कशी मात करता येईल हे तिने ऐकले होते.