Join us  

अवतार या चित्रपटामुळे गोविंदाची उडवली जातेय अशी खिल्ली, पाहा मीम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 2:35 PM

अवतार या चित्रपटाचे नाव या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांना मीच सुचवले होते. इतकेच नव्हे तर या सिनेमाची ऑफर देखील मलाच मिळाली होती असे गोविंदाने नुकतेच सांगितले आहे.

ठळक मुद्देगोविंदाला नेटकऱ्यांनी या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. काहींनी तर अवतारच्या पोस्टरमध्ये गोविंदाचा फोटो टाकत त्याची खिल्ली उडवली आहे

अभिनेता गोविंदा अलीकडे ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला. पण बॉक्स ऑफिसवर त्याचा हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 90 च्या दशकात गोविंदा नावाची क्रेज होती. गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. या हिट चित्रपटाची यादी बरीच मोठी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याला एकही हिट चित्रपट देता आलेला नाही. नुकताच तो आप की अदालत या कार्यक्रमात झळकला होता. या कार्यक्रमातील त्याच्या मुलाखतीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात त्याने केलेल्या एका दाव्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली देखील उडवली जात आहे.

 

गोविंदाने नुकत्याच दिलेल्या आप की अदालत या कार्यक्रमाच्या मुलाखतीत म्हटले आहे की, अवतार या चित्रपटाचे नाव या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांना मीच सुचवले होते. इतकेच नव्हे तर या सिनेमाची ऑफर देखील मलाच मिळाली होती. या चित्रपटासाठी मला जवळजवळ ४१० दिवस चित्रीकरण करावे लागणार होते आणि संपूर्ण शरीराला रंगवण्यासाठी बॉडी पेंटचा वापर केला जाणार होता. 

 

माझ्यासाठी हे सगळे शक्य नसल्याने मी हा चित्रपट नाकारला. पण त्याचवेळी हा चित्रपट हिट होईल असे मी त्यांना सांगितले होते. बॉडी पेंट करण्याला माझा विरोध असल्यानेच मी हा चित्रपट करायचा नाही असे ठरवले होते. गोविंदाच्या या खुलाशानंतर आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे तर काहींनी त्याच्या या वक्तव्यावरून त्याच्यावर निशाणा साधला आहे.

 

गोविंदाला नेटकऱ्यांनी या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. काहींनी तर अवतारच्या पोस्टरमध्ये गोविंदाचा फोटो टाकत त्याची खिल्ली उडवली आहे.

एकाने गोविंदाला जर अवतार हा चित्रपट ऑफर झाला असले तर सलमानला फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळाले आहे असे म्हटले आहे.

तर गोविंदाने अवतार हा चित्रपट केला असता त्यात त्याची रिअ‍ॅक्शन काय असती हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. गोविंदावर बनवण्यात आलेले हे मीम्स सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

 

टॅग्स :गोविंदा