Join us  

‘एक चुम्मा’चा वाद, 23 वर्षांनंतर गोविंदा-शिल्पा शेट्टीला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:49 PM

गोविंदा आणि शिल्पावर चित्रीत हे गाणे तुफान गाजले होते. पण बिहार व युपीच्या लोकांना या गाण्याचे शब्द ऐकून संतापले होते आणि या गाण्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

ठळक मुद्दे 1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘छोटे सरकार’ या गाण्याचे. होय, या चित्रपटात ‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ असे गाणे होते.

एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...या 23 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटातील गाण्याने गोविंदा आणि शिल्पा शेट्टीला हैरान केले होते. गोविंदा आणि शिल्पावर चित्रीत हे गाणे तुफान गाजले होते. पण बिहार व युपीच्या लोकांना या गाण्याचे शब्द ऐकून संतापले होते आणि या गाण्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. हे गाणे अश्लिल असून युपी-बिहारची बदनामी करणारे आहे, असा युक्तिवाद करण्यात आला होता. ही याचिका दाखल झाल्याच्या 23 वर्षांनंतर अखेर गोविंदा व शिल्पाला दिलासा मिळाला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावली आहे.यापूर्वी न्यायालयाने शिल्पा व गोविंदाविरोधातील अटक वॉरंटला स्थगिती दिली होती.

न्या. अमिताभ गुप्ता यांनी याप्रकरणी या दोन्ही कलाकारांच्या बाजूने निकाल दिला. फिल्म स्टार्सवर सामान्य नियम लागू होत नाहीत. कारण चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केलेला होता, असे सांगत न्या. गुप्ता यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल केला.

काय आहे प्रकरण हे प्रकरण आहे, 1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘छोटे सरकार’ या गाण्याचे. होय, या चित्रपटात ‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ असे गाणे होते. हे गाणे अपमानास्पद असल्याचे सांगत मुकूंद तिवारी यांनी सन 1997 मध्ये पाकुडच्या कनिष्ठ न्यायालयात शिल्पा व गोविंदाविरोधात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने शिल्पा व गोविंदा या दोघांना समन्स जारी केला होता. मात्र समन्स जारी होऊनही शिल्पा-गोविंदा न्यायालयात हजर झाले नाहीत. यानंतर न्यायालयाने दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केला. कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला दोघांनीही उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणावर सुनावणी करताना शिल्पा व गोविंदाची बाजू मांडणा-या वकीलांनी हे गीत केवळ मनोरंजनासाठी असल्याचा युक्तिवाद केला होता. हे गीत शिल्पा व गोविंदावर चित्रीत केले होते. पण त्यांनी ना ते गायले, ना लिहिले. चित्रपट सुरु होण्यापूर्वी या चित्रपटातील दृश्य व संवाद केवळ मनोरंजनासाठी असल्याचे शिवाय त्याचा कुणाशीही संबंध नसल्याचा संदेश दाखवला गेला होता, असे या वकीलाने म्हटले होते. 

टॅग्स :गोविंदाशिल्पा शेट्टी