Join us  

हे आहे गोविंदाचे खरे नाव, त्याने तब्बल सहा वेळा बदलली आहेत नावं, त्यानेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 6:00 AM

गोविंदाने त्याचे नाव एकदा नव्हे तर तब्बल सहा वेळा बदलले आहे, त्यानेच याविषयी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सांगितले.

ठळक मुद्देगोविंदाने या कार्यक्रमात सांगितले की, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी गोविंदा हे नाव ठरवण्यापूर्वी त्याने तब्बल सहा वेळा त्याचे नाव बदलले असून गोविंद आहूजा, गोविंद राज, राज गोविंद, अरुण गोविंद अशी विविध नावे त्याने ठेवली होती.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आणि मुलगी टीना आहूजासोबत हजेरी लावणार आहेत.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात गोविंदा त्याची मुलगी टीनाच्या मिलो ना तुम या गाण्याचे प्रमोशन करताना दिसणार आहे. गोविंदा कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत त्याच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गप्पा गोष्टी करणार आहे. गोविंदाचे खरे नाव गोविंद आहूजा असून त्याने चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्याचे नाव बदलले असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण गोविंदाने त्याचे नाव एकदा नव्हे तर तब्बल सहा वेळा बदलले आहे हे तुम्हाला माहीत आहे का? गोविंदानेच याविषयी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सांगितले. 

गोविंदाने या कार्यक्रमात सांगितले की, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी गोविंदा हे नाव ठरवण्यापूर्वी त्याने तब्बल सहा वेळा त्याचे नाव बदलले असून गोविंद आहूजा, गोविंद राज, राज गोविंद, अरुण गोविंद अशी विविध नावे त्याने ठेवली होती. या कार्यक्रमात गोविंदाची मुलगी टीनाला विचारण्यात आले की, तुझ्या आई-वडिलांमध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता गोविंदाच्या मुलीने सांगितले की, माझे वडील स्लिपिंग ब्यूटी असून ते कधीही झोपून जातात. 

गोविंदाच्या पत्नीने या कार्यक्रमात अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने सांगितले की, गोविंदा कमवत असला तरी त्याच्याकडे एकही क्रेडिट कार्ड मी ठेवत नाही. सगळे क्रेडिट कार्ड हे माझ्याकडेच असतात. 

अभिनेता गोविंदा अलीकडे ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला. पण बॉक्स ऑफिसवर त्याचा हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 90 च्या दशकात गोविंदाची चांगलीच क्रेज होती. गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. या हिट चित्रपटाची यादी बरीच मोठी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याला एकही हिट चित्रपट देता आलेला नाही. 

टॅग्स :गोविंदाद कपिल शर्मा शोकपिल शर्मा