प्रियंकाच्या फ्रेंड्ससोबत गप्पाटप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 11:00 IST
प्रियंका चोप्राच्या करिअरचा आलेख आता हळूहळू बॉलीवूडकडून हॉलीवूडच्या दिशेने सरकताना दिसतो आहे. तिच्या १३ वर्षांच्या बॉलीवूडमधील करिअरमध्ये तिचा उत्तम ...
प्रियंकाच्या फ्रेंड्ससोबत गप्पाटप्पा!
प्रियंका चोप्राच्या करिअरचा आलेख आता हळूहळू बॉलीवूडकडून हॉलीवूडच्या दिशेने सरकताना दिसतो आहे. तिच्या १३ वर्षांच्या बॉलीवूडमधील करिअरमध्ये तिचा उत्तम अभिनय, चार्मिंग पर्सनॅलिटी आणि स्क्रिनवर काम करण्याची उत्तम पकड यांच्यामुळे तिचे नाव झाले आहे.‘क्वांटिको’ या अमेरिकन शो मुळे तिला हॉलीवूडमध्ये चांगलीच लिफ्ट मिळाली आहे. आता तिच्या चाहत्यांना सेलिब्रेट करण्यासाठी एक उत्तम कारणच मिळाले आहे. ती नुकतीच तिच्या मैत्रीणींसोबत गप्पाटप्पा करताना दिसली.मध्यंतरी एक वेळ अशी होती की, तिला थोडाही वेळ स्वत:साठी काढता येत नव्हता. ती अत्यंत बिझी होती. मात्र, आता असे म्हणता येऊ शकते की, ती तिच्या बेवॉच टीमच्या फ्रेंड्ससोबत खुप मजेत आहे.