Join us

​सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘बिर्इंग ह्युमन’ बाईक करणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 21:37 IST

सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सलमानने ‘बिर्इंग सलमान’ हे अ‍ॅप लाँच करून ...

सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सलमानने ‘बिर्इंग सलमान’ हे अ‍ॅप लाँच करून चाहत्यांना खुश केले होते. आता पुन्हा एकदा तो चाहत्यांना आगळी-वेगळी भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खानचे देशभर चाहते आहेत. पेहराव करण्यापासून त्याच्यासारखी हेअर स्टाईल ठेवणारे त्याचे चाहते कमी नाहीत. याच चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी सलमान खानने नुकतेच ‘बिर्इंग सलमान’ अ‍ॅप लाँच केले होते. आता तो ‘बिर्इंग ह्युमन’ बाईक लाँच करण्याचा विचार करीत आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आपला ‘बिर्इंग ह्युमन’ या ब्रँडचा अधिकाधिक प्रचार करण्याचा विचार करीत आहे. या मालिके तील पहिले अ‍ॅप लाँच झाल्यावर आता तो बाईक लाँच करणार आहे. सलमानच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते व बाईक लव्हर्स आनंदी होतील यात शंकाच नाही. मात्र अद्याप सलमानने याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. सलमान खानने २००७ साली गरीबांची मदत करण्यासाठी ‘बिर्इंग ह्युमन’ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून सलमान हजारो लोकांना मदत केली आहे.‘बिर्इंग ह्युमन’च्या माध्यमातून कठीण परिस्थितीत जगणाºया लोकांना आरोग्य व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देते. सुमारे ५० कोटी रुपयांची मदत आतापर्यंत सलमानने आपल्या चाहत्यांना केली आहे. यात गरीब मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांचा देखील सामवेश आहे. ‘बिर्इंग ह्युमन’ स्थापन झाल्यापासून सलमान स्वत: याचे प्रमोशन करताना दिसतो. अनेक ठिकाणी सलमान खान ‘बिर्इंग ह्युमन’ लिहिलेले टी-शर्ट घालून फिरताना दिसतो. लोकांना भेट देण्यासाठी देखील तो या संस्थेचा लोगो असलेल्या वस्तू भेट देतो असेही सांगण्यात येते. ‘बिर्इंग ह्युमन’ लिहलेले टी शर्ट देखील बाजारात आले आहेत. मात्र, अद्याप सलमानने याचे अधिकृत लाँचिंग केले नाही. आता तो थेट बाईकच लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाईकच्या विक्रीतून मिळणारा पैसा त्याच्या फाऊंडेशनला दिला जाणार आहे.