Join us
Daily Top 2Weekly Top 5

गीता कपूर यांच्यापाठोपाठ अभिनेत्री अनिता सिन्हा यांनी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 14:27 IST

बॉलिवूड अभिनेत्री गीता कपूर यांनी अलीकडे जगाचा निरोप घेतला. गीता कपूर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने आज सकाळी अखेरचा श्वास ...

बॉलिवूड अभिनेत्री गीता कपूर यांनी अलीकडे जगाचा निरोप घेतला. गीता कपूर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने आज सकाळी अखेरचा श्वास घेत, या जगाला अलविदा म्हटले. या अभिनेत्री म्हणजे अनिता सिन्हा. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत ‘रोटी’ या चित्रपटात अनिता सिन्हा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.गुरूवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू कशाने झाले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मुंबईच्या गोरगाव येथे राहणा-या अनिता यांनी लग्न केले नव्हते. पण त्यांचा एक मानस पुत्र आहे. अनिता यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्या लोकांची आवर्जुन चौकशी करत, त्यांना भेटायच्या बोलायच्या. शारिरीकदृष्ट्याही त्या एकदम फिट होत्या. पण आज सकाळी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यांना ओळखणा-या अनेकांना यामुळे धक्का बसला. अनिता यांचे वडिल उत्तर प्रदेश लखनौचे राहणारे होते आणि किशोर कुमार यांचे अतिशय जवळचे होते.  अनिता सिन्हा चित्रपटात बॉडी डबलचेही काम करायच्या. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.