किसी से प्यार हो जाये... काबिलचे नवे गाणे रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 20:27 IST
kisi se pyaar ho jaaye, kabil new song released ; १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘जुली’ या चित्रपटातील ‘किसी से प्यार हो जाए’ या गाण्यास पुर्नचित्रित करण्यात आले असून त्यास नव्या पद्धतीने ‘काबिल’मध्ये मांडण्यात आले आहे.
किसी से प्यार हो जाये... काबिलचे नवे गाणे रिलीज
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री यामी गौतम यांचा आगामी चित्रपट ‘काबिल’चे जोरदार प्रमोशन सुरू असून या चित्रपटातील ‘किसी से प्यार हो जाये’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘जुली’ या चित्रपटातील ‘किसी से प्यार हो जाए’ या गाण्यास पुर्नचित्रित करण्यात आले असून त्यास नव्या पद्धतीने ‘काबिल’मध्ये मांडण्यात आले आहे. हृतिक रोशन व अभिनेत्री यामी गौतम यांचा ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दोघांची जोडी चाहत्यांना चांगलीच भावते आहे. या चित्रपटातील गाण्यांनी हृतिकच्या चाहत्यांना भूरळ घातली असून आता चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘काबिल’मधील ‘किसी से प्यार हो जाए’ हे गाणे जुबिन नौतियाल याच्या आवाजात असून या गाण्याला राजेश रोशन यांनी स्वरसाज चढविला आहे. जुली चित्रपटातील हे गाणे नव्याने वापरताना काही शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यात अंध असलेल्या हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा रोमान्स दाखविण्यात आला आहे. अंधांचे प्रेम कसे असू शकते हे दाखविण्यासाठी दिग्दर्शकांने सर्वांत योग्य गाणे निवडले आहे असेच या गाण्याबाबत म्हणता येईल. हृतिक व यामी मधील केमेस्ट्री या आधी ‘मूर अमोर’ या गाण्यातून चाहत्यांनी अनुभवली आहे. हे गाणे त्या अनुभवाला आणखी चांगल्या पद्धतीने साकारताना दिसणार आहे. प्रेम आंधळे असते असे म्हणताना अंध व्यक्तींसाठी ते स्पर्शातून अनुभवायाचे असते असाच या गाण्याचा गाभा आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटासमोर शाहरुख खानच्या ‘रईस’चे आव्हान असणार आहे.