Join us  

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने चक्क दुबईच्या रस्त्यावर लावले ठुमके, व्हिडीओ झाला वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 4:01 PM

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतात.

अभिनेत्री जॉर्जिया ऍंड्रियानी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये दुबईला रवाना झाली, जिथे ती आपल्या बर्‍याच प्रोजेक्टवर काम करत आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. जॉर्जिया तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. स्विमिंग सूट परिधान करून उंटावर बसून फिरणे असो किंवा लक्झरी कार सोबत फोटो असो, सोशल मीडियावरील जॉर्जिया पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरते.  

जॉर्जिया ऍंड्रियानीने  नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 'यो यो हनी सिंग' आणि 'नेहा कक्कर' च्या "नॉटी सैंयाजी" या गाण्यावर दुबईच्या रस्त्यावर आपल्या कोरियोग्राफर बरोबर डान्स करताना दिसत आहे.  हा व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस पात्र ठरला असून भरभरु लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताच चोवीस हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ही संख्या वाढतच आहे.  काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने दुबईतील तिचे काही फोटो देखील शेअर केले होते. जॉर्जिया बॉलिवूडमध्ये रूप तेरा मस्तानामध्ये दिसली होती.

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे.अरबाज खान आणि जॉर्जियाच्या अफेअरच्या चर्चा रंगतात. अनेकदा दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. लॉकडाऊनमध्ये जॉर्जिया आणि अरबाज खान एकत्र राहिले होते. अरबाज सोबत मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर करत असते.

जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.

टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान