Join us  

Video : बलम पिचकारी जो तूने मुझे मारी, रितेश देशमुख- जेनेलिया डिसूझाची रोमाँटिक होळी पहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 1:04 PM

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा कदाचित चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते.  जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचे व्हिडिओही चाहत्यांनी खूप पसंतीस उतरत असतात. होळीच्या निमित्ताने जेनेलियाने रितेशबरोबर तिचा एक रोमँटिक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  जेनेलियाने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. 

व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया होळीत्या रंगाlत रंगले  आहेत आणि जेनेलिया रितेशवर फुले फेकताना दिसतेय.  या रोमँटिक व्हिडिओमध्ये रितेश शेवटी जेनेलियाच्या संपूर्ण चेहऱ्याला रंग लावतो. व्हिडिओ पोस्ट करताना जेनेलियाने लिहिले की, 'कोरोनाच्या  निर्बंधामुळे हा उत्सव आपल्या मार्गाने खास बनवा.  होळीच्या शुभेच्छा. रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. काही दिवसांपूर्वीच जेनेलिया डिसुझाने एक मजेशीर व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओ ,एका अवॉर्ड फंक्शनमधला होता. यात रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला भेटल्यावर तिच्या बोलून झाल्यावर तिच्या हाताची किस घेताना दिसतो आहे आणि हे सगळे एका बाजूला उभी राहून जेनेलिया पाहताना दिसते आहे. खरेतर हा जुना व्हिडीओ आहे, हा व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता. मात्र आता या व्हिडीओनंतर काय घडले, हे जेनेलियाने या व्हिडीओत दाखवले आहे. जेनेलियाने घरी आल्यावर रितेशला क्या किया क्या किया म्हणत मारण्याची एक्शन केली होती.

 ​रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा नेहमी मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि बऱ्याचदा त्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख