Join us

गौरी खानने शाहरुख खानसोबतचा जुना फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 11:14 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सगळ्यात इंट्रेस्टिंग लव्ह स्टोरी आहे. दोघांनी आपल्या लग्नाची ...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सगळ्यात इंट्रेस्टिंग लव्ह स्टोरी आहे. दोघांनी आपल्या लग्नाची सिलव्हर जुबलीसुद्धा सेलिब्रेट केली आहे मात्र लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांचे एकमेंकावरील प्रेम कमी झालेले नाही. वर्ष सरत गेली तसे त्यांचे एकमेंकावरचे आणि नातं अधिक घट्ट होत गेले. सध्या गौरी खान सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह झालेली आहे. काही दिवसांपूर्वी गौरीने आपला मुलगा आर्यन खानचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत गौरीने एक मजेशीर कॅप्शन देखील लिहिले होते. गौरीने लिहिले होते की, ''जर आर्यना कळले मी त्याचा फोटो शेअर करते आहे तर तो मला नक्कीच रागवेल.'' नुकताच गौरीने तिचा शाहरुख खान सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप जुना आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटो त्यांच्यासोबत एक पप्पी पण दिसतो आहे. गौरीने या फोटोसोबत एक कॅप्शनदेखील लिहिले आहे, जुन्या फोटोला नवा करण्याचा प्रयत्न करते आहे. गौरी या फोटोत खूपच खुश दिसते आहे. अर्थात हा फोटो शाहरुख खान आणि गौरीमध्ये असलेल्या प्रेमाबाबत खूप काही सांगून जाते. काही दिवसांपूर्वीच एका टॉक शो दरम्यान शाहरुख खानने सांगितले होते की,'' घरात कोणाचा बर्थ डे असेल तर त्याची सगळी जबाबदारी गौरावर येते. माझ्यासोबत ती घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते.''  गौरी आणि शाहरुख खानची लव्हस्टोरी कोणत्या चित्रपटातील लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातील राज मल्होत्रा साऱख्या अनेक  सीन्सना शाहरुखने खऱ्या आयुष्यात ही तोंड दिले आहे. गौरीपर्यंत पोहोचण्याचा शाहरुखचा प्रवास फार खडतर होता. मात्र या संपूर्ण प्रवासात गौरी शाहरुखच्या मागे नेहमीच उभी होती. ALSO READ : किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान साकारणार भूताची भूमिका?गौरी ही आज शाहरुखनची पत्नी असण्यासोबत एक प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आहे. नुकताच करण जौहरच्या मुलांचा रुप तिने सजवला होता. अनेक बॉलिवूड अभिनेत्यांची घरं गौरीने सजवली आहेत.