Join us  

जगभरातील बॉक्स ऑफिसवर सनी पाजीच्या 'गदर २'चा धूमाकूळ, कमाईचा आकडा पोहोचला ५०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 1:58 PM

तारा सिंगचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे.

सनी देओलचा चित्रपट गदर 2 फक्त भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. तारा सिंगला जगभरात पसंती मिळत असून तिची सर्वत्र चर्चा होत आहे.सनी देओलचा ‘गदर २’ दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम करत आहे.. ‘गदर २’चे शो हाऊसफूल होत आहेत.  तारा सिंह आणि सकिना यांच्या कथेने जगभरातील बॉक्स ऑफिसवर डंका आहे. गदर 2 चे जगभरातील कलेक्शन समोर आले आहे, त्यानंतर तो 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

गदर २ रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. आता हा सिनेमा रिलीज होऊन तीन आठवडे पूर्ण करणार आहे मात्र तरीही त्याची बॉक्स ऑफिसवर पकड मजबूत आहे. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल सांगणार आहोत.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, गदर 2 ने जगभरात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने 525.14 कोटींचा गल्ला जमावला. हे कलेक्शन लवकरच 600 कोटींच्या घरात जाऊ शकते. 

गदर 2 रिलीज होऊन 13 दिवस झाले आहेत. गदर 2 ने 13 दिवसात भारतात 411.10 कोटी कमावले आहेत.  मात्र, आता भारतात गदर २ चा वेग थोडा मंदावला आहे.

गदर 2 बद्दल बोलायचे तर हा 2001 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसले आहेत. त्याचबरोबर मनीष वाधवाने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. गदर 2 च्या यशानंतर आता गदर 3 च्या बातम्या येत आहेत. सनी देओलने या वृत्ताचे नुकतेच खंडन केले आहे.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेल