Join us  

“मी तुझं लग्न लावून देतो”, अमिषा पटेलला असं का म्हणाला संजय दत्त? अभिनेत्रीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 6:00 PM

संजय दत्तबद्दल अमिषा पटेलचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न लावून देण्यासाठी..."

‘गदर २’ या बॉलिवूड चित्रपटाचा सगळीकडेच बोलबाला आहे. या चित्रपटात सकिनाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अमिषा पटेलही सध्या चर्चेत आहे. ‘गदर २’च्या सक्सेसनंतर अमिषाने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. या मुलाखतींतून अमिषाने अनेक खुलासेही केले आहेत. असाच खुलासा तिने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तबद्दल केला आहे. संजय दत्त गेल्या २० वर्षांपासून अमिषा पटेलचं लग्न लावण्यासाठी उत्सुक असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

अमिषाने नुकतीच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने संजय दत्त तिच्या कुटुंबाचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “तू या इंडस्ट्रीसाठी खूप साधी आहेस, असं मला संजय दत्त म्हणतात. तू खूप भोळी आहेस. तू चल मी तुझं लग्न लावून देतो. गेल्या २० वर्षांपासून ते माझ्यासाठी जोडीदार शोधत आहेत. ही छोटी मुलगी आहे, हिला खेळणं द्या, असं ते म्हणतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही मुलांनी मला लग्नासाठी मागणीही घातली होती. परंतु, मी त्यांना रिजेक्ट केलं."

“ही तर झाडूवाली पण दिसणार नाही”, ऑडिशनदरम्यान उर्मिला निंबाळकरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली, "माझ्या तोंडावर..."

हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं?

“जेव्हा तुझं लग्न होईल, तेव्हा मी कन्यादान करेन. मी तेव्हा खूप खूश असेन, असंही संजू म्हणतात. तुझी मुलं मग माझ्या मुलांबरोबर खेळतील, असंही ते म्हणतात,” असंही अमिषाने सांगितलं. अमिषा आणि संजय दत्तने ‘चतुर सिंह टू स्टार’ आणि ‘तथास्तु’ या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. अमिषा दिग्दर्शक विक्रम भट्टबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर तिचं नाव व्यावसायिक कुणाल गूमरशी जोडलं गेलं होतं. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.

अमिषाने 'गदर २'च्या दिग्दर्शकावरही आरोप केले होते. सकिनाचा रोल न वाढवल्यास 'गदर ३' मध्ये काम करणार नसल्याचं अमिषाने म्हटलं होतं. दरम्यान, सनी देओलचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ५०० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

टॅग्स :संजय दत्तअमिषा पटेलबॉलिवूड