‘फ्रीकी अली’ वांद्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 17:30 IST
नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘फ्रीकी अली’ हा चित्रपट उद्या (९ सप्टेंबर) प्रदर्शित होत आहे. मात्र ऐन रिलीजच्या एक दिवसाआधी नवाजचा हा ...
‘फ्रीकी अली’ वांद्यात!
नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘फ्रीकी अली’ हा चित्रपट उद्या (९ सप्टेंबर) प्रदर्शित होत आहे. मात्र ऐन रिलीजच्या एक दिवसाआधी नवाजचा हा चित्रपट वांद्यात सापडला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे चित्रपटातील एका सीनवरून वाद निर्माण झाला आहे. सूत्रांच्या मते, मेरठच्या काही संघटनांनी या दृश्यावर आक्षेप घेतला आहे. या दृश्यात नवाजुद्दीनच्या तोंडात गोल्फ बॉल आहे आणि त्या बॉलवर ‘अली’ असे लिहिलेले आहे. बॉलवर अशाप्रकारे ‘अली’ लिहिणे हजरत अलीचा अपमान असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. संबंधित संघटनांनी हे दृश्य चित्रपटातून कापण्याची मागणी लावून धरली आहे. सोहेल खान दिग्दर्शित ‘फ्रीकी अली’ उद्या रिलीज होत आहे. सलमाननेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. नवाजुद्दीनसह एमी जॅक्सन आणि अरबाज खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.